रामपुर : आयुष्यात जिद्द असेल आणि व्यक्ती आपल्या स्वप्नांप्रती प्रामाणिक असेल, तर तो त्याची स्वप्ने पूर्ण करू शकतो हे एका तरुणीने सिद्ध केले आहे. एका तरुणीने मोठ्या कंपनी काम करण्याचे आणि मोठ्या पॅकेजवर काम करण्याचे स्वप्न पाहिले होते. यासाठी तिने कठोर मेहनत घेतली आणि आज तिचे स्वप्न पूर्ण झाले आहे. नेमकी तिची ही प्रेरणादायी कहाणी काय आहे, हे जाणून घेऊयात.
advertisement
प्रकृती जोशी असे या तरुणीचे नाव आहे. तिला वार्षिक 45 लाख रुपयांचे पॅकेज मिळाले आहे. ती उत्तरप्रदेशातील रामपूरच्या सिविल लाइन पोलीस ठाणे हद्दीतील विकास कॉलनीत राहते. तिला एका मल्टिनॅशनल कंपनी नोकरी लागली आहे. तिच्या या यशानंतर कुटुंबात आनंदाचे वातावरण असून तिच्यावर अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
प्रकृती ही जगातील सर्वोच्च कंपन्यांपैकी एक असलेल्या अॅमेझॉनमध्ये बेंगळुरू येथे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट अभियंता म्हणून काम करत आहे. इतकंच नाही तर प्रकृती जोशी हिने इयत्ता 10वीच्या सर्व विषयात 100 टक्के गुण मिळवले होते. तर तिने 12वीत 93 टक्के गुण मिळवून आपल्यातील प्रखर बुद्धिमत्तेची ओळख करुन दाखवली. यानंतर इंजिनीअरिंगच्या अभ्यासादरम्यान ॲमेझॉनने कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये सहा महिन्यांच्या इंटर्नशिपची ऑफर दिली होती. यानंतर तिची आता सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनीअर या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रकृति जोशीचे वडील दीप जोशी हे गणिताचे शिक्षक आहेत. तसेच त्यांनी लिम्का बुक ऑफ रिकॉर्ड्स मध्ये आपल्या नाव नोंदवले आहे. तर तिची आई ऋतु जोशी यांचा गंभीर आजाराने मृत्यू झाला आहे. तिच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, प्रकृती जेव्हा बी.टेक करत होती, तेव्हा तिची आई कॅन्सरने ग्रस्त होती. हा काळ आम्हा सर्वांसाठी खूप कठीण होता. या कठीण परिस्थितीत अभ्यासासोबतच प्रकृतीने आपल्या आईची काळजी घेतली असे तिच्या वडिलांनी सांगितले.
प्रकृतिने दयावती मोदी अकादमीमधून दहावीचे शिक्षण घेतले. यानंतर महर्षि विद्या मंदिर वरिष्ठ माध्यमिक विद्यालयातून ती बारावी उत्तीर्ण झाली. प्रकृतीला एक भाऊसुद्धा आहे. दोन्ही भाऊ आणि बहिणींनी त्यांच्या कुटुंबाला वैभव प्राप्त करून दिले. दोघांनी एकत्र शिक्षण घेतले. प्रकृतीच्या भावानेही कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.टेक पूर्ण केले आहे आणि आता तो नोएडा येथील ट्रिप चेक कंपनीमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट पदावर कार्यरत आहे. दोन्ही भाऊ बहिणींचा हा प्रवास तरुणाईला प्रेरणादायी आहे.
