आमिष दाखवून केले घृणास्पद कृत्य
चिमुकलीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने 'आंबा खायला देतो' असे आमिष दाखवून त्या लहान मुलीला आपल्या घरी नेले. काही वेळातच मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून तिच्या आईने तिला जवळ घेतले. तेव्हा तिला हा प्रकार लक्षात आला आणि ती हादरून गेली. आईने तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीवर गुन्हा दाखल करत त्याला तात्काळ अटक केली आहे.
advertisement
समाजातून तीव्र संताप
ही घटना केवळ एका निष्पाप मुलीवरचा अत्याचार नसून, संपूर्ण समाजाच्या अंत:करणावर झालेला आघात आहे. या घृणास्पद कृत्यामुळे सामाजिक संघटना आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. माणुसकीची राखरांगोळी करणाऱ्या या नराधमाला कठोर शिक्षा द्यावी, अशी जोरदार मागणी सर्व स्तरातून करण्यात येत आहे.
हे ही वाचा : धक्कादायक! वृद्ध आईच्या सेवेवरून पत्नीसोबत वाद; पतीने भररस्त्यात होर्डिंगला गळफास घेऊन संपवलं जीवन
हे ही वाचा : 10 वीतील विद्यार्थिनीवर अत्याचार! जीवे मारण्याची धमकी देऊन लॉजवर नेले, साताऱ्यात खळबळ