TRENDING:

ओठांचा चावा अन् डोक्यावर वार, अडीच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, बुलडाणा हादरलं

Last Updated:

दिवसेंदिवस क्राईमच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. लोकांची वृत्ती अधिक खालच्या धराला जात असून अनेक नराधम तयार होतायेत. अशातच बुलढाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय ज्यामध्ये अडीच वर्षाच्या चिमुकलीवर 17 वर्षीय नारधमाने केला अत्याचार केला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
राहुल खंडारे, 24 नोव्हेंबर : दिवसेंदिवस क्राईमच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. लोकांची वृत्ती अधिक खालच्या धराला जात असून अनेक नराधम तयार होतायेत. अशातच बुलढाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय ज्यामध्ये अडीच वर्षाच्या चिमुकलीवर 17 वर्षीय नारधमाने केला अत्याचार केला. या घटनेनं एकच खळबळ उडाली असून संपूर्ण बुलढाणाच हादरला आहे.
अडीच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, बुलडाणा हादरलं
अडीच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, बुलडाणा हादरलं
advertisement

बुलढाणा जिल्ह्यातील बोराखेडी पोलीस स्टेशन हद्दीत हा प्रकार घडलाय. नांदुरा तालुक्यातील एका गावात अडीच वर्षीय चिमुकलीवर एका सतरा वर्षीय नराधमाने अत्याचार केले आहे. खाऊ देण्याचं आमिष दाखवून या नराधमानं या चिमुकलीवर शारीरिक अत्याचार केले. तिच्या ओठावर चावा घेतला आहे. तर डोक्यात मारून जखमी केले आहे. मुलीच्या अंगावर अनेक जखमा आढळून आल्या. या धक्कादायक घटनेमुळे बुलढाणा जिल्हा चांगलाच हादरला आहे.

advertisement

Shrirampur: RTO कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला, सहीसाठी एजंटची दादागिरी

परिस्थितीजन्य पुरावाच्या आधारावरून सतरा वर्षीय अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलंय. तर पिडीत चिमुकलीला सुरुवातीला बुलढाणा येथील सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आले, मात्र तिची प्रकृती चिंताजनक असल्यानं तिला पुढील उपचारासाठी अकोला येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलंय.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सांधेदुखी होईल कमी, जेवणात समावेश करा कडीपत्ता आणि तिळाची चटणी, रेसिपीचा Video
सर्व पहा

दरम्यान, बुलढाण्यात आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला. भुसावळ येथे जळगांव मधून हा धक्कादायक प्रकार समोर आला. जळगांव जामोद तालुक्यातील खेर्डा खुर्द या गावातील आरोपी विठ्ठल समाधान दामोदर वय 50 वर्षे यानं त्याच्या राहत्या घरी खाऊचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीला बोलावले व तिच्यावर दुष्कृत्य केले. याबद्दल तू कुणाला सांगितले तर तुला जिवाने मारून टाकीन अशी धमकी सुद्धा पीडितेला दिली. पीडिताच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विठ्ठल समाधान दामोदर याच्याविरुद्ध कलम 376, 376(अ),(ब),506 सह कलम 4, 8,12 बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला मात्र सदर आरोपी फरार झाला होता. मात्र जळगांव जामोद पोलिसांना गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीला भुसावळ येथून ताब्यात घेतलं.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
ओठांचा चावा अन् डोक्यावर वार, अडीच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, बुलडाणा हादरलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल