Shrirampur: RTO कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला, सहीसाठी एजंटची दादागिरी
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
श्रीरामपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. आरटीओ कार्यालयात एका एजंटनं कर्मचाऱ्यावर हल्ला केला. या घटनेनं कार्यालयात एकच खळबळ उडालेली पहायला मिळाली.
हरिश दिमोटे, श्रीरामपूर, 24 नोव्हेंबर : श्रीरामपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. आरटीओ कार्यालयात एका एजंटनं कर्मचाऱ्यावर हल्ला केला. या घटनेनं कार्यालयात एकच खळबळ उडालेली पहायला मिळाली. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ समोर आलाय.
श्रीरामपूर आरटीओ कार्यालयात एजंट लोकांची मुजोरी पहायला मिळाली. कागदपत्रावर सही केली नाही म्हणून थेट कर्मचाऱ्यावर हल्ला केला. कर्मचाऱ्याला मारहाण करत चॉपरने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ही घटना काल दुपारची श्रीरामपूर आरटीओ कार्यालयात घडली.
23 नोव्हेंबरच्या दुपारी, श्रीरामपूर आरटीओ कार्यालयात कामकाज सुरू असताना, आरटीओ कार्यालयात दुपारी 1.30 ते 2 वाजेच्या दरम्यान, एजंटगिरी करणाऱ्या हुजेफ यूनुस जमादार यानं वाहनावरील बोजा कमी करत, वाहन हस्तांतरन करण्याचं काम करून दे, असं म्हणत आरटीओ कार्यालयात, कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असलेल्या सुनील जगन्नाथ शेवरे यांना, मी कोण आहे तुला माहीत नाही थांब तुला दाखवतो, म्हणत अरेरावी व शिवीगाळ केला. धारदार लोखंडी हत्यार व 14 ते 15 विशिष्ट समाजाच्या लोकांसोबत,आरटीओ कार्यालयातील केबिन मध्ये घुसून त्यांना चाकूचा धाक दाखवून आरटीओ कार्यालयातील कर्मचा-यास मारहाण केल्याची घटना घडली.
advertisement
Shrirampur: RTO कर्मचाऱ्यावर एजंटचा हल्ला, कागदपत्रावर सही केली नाही म्हणून दादागिरी#news18marathi pic.twitter.com/I53djXT1a8
— News18Lokmat (@News18lokmat) November 24, 2023
या संदर्भात आरटीओ कार्यालयात, कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असलेल्या सुनील जगन्नाथ शेवरे यांच्या फिर्यादीवरून, श्रीरामपूर पोलीस ठाण्यात भादवी कलम 353, 332, 183, 34, अनुसूचित जाती आणि जमाती ३(1), (r) (s) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी तात्काळ, गुन्ह्यातील मुख्य आरोपी हुजेफ यूनुस जमादार यास ताब्यात घेतलं. इतर आरोपींचा शोध सध्या श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 24, 2023 9:31 AM IST


