हे संपूर्ण प्रकरण जालौनच्या काल्पी कोतवाली भागातील आहे, जिथे अमन वर्मा आणि बालेंद्र पाल नावाच्या दोन मित्रांनी एका निर्जन ठिकाणी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेत बालेंद्रचा जागीच मृत्यू झाला, तर अमनची प्रकृती बिघडू लागली, म्हणून त्यानी कुटुंबीयांना फोन करून याबाबत माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी घटनास्थळ गाठून दोघांनाही तातडीने उपचारासाठी काल्पी येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात नेलं. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच अमनचा मृत्यू झाला. बालेंद्रचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता.
advertisement
घरातून फरार झाल्या 3 मुली; चिठ्ठी वाचून कोणी शोधायचं धाडसही केलं नाही, आता समोर आलं धक्कादायक सत्य
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली असून त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. अमन आणि बालेंद्र यांची घट्ट मैत्री असल्याचं तपासात उघड झालं. अमन मेडिकल स्टोअर चालवत होता आणि त्याचं लग्न झालं होतं. तर बालेंद्रचं लग्न झालं नव्हतं आणि तो अमनकडे अनेकदा ये-जा करायचा.
दोघंही ओशोंचे प्रवचन ऐकत असत आणि त्यांच्यावर त्यांचा खूप प्रभाव पडत असे. आत्महत्या करण्यापूर्वी दोन्ही मित्रांनी त्यांच्या मोबाईलवर तीन स्टेटस पोस्ट केले होते, ज्यावरून ते मृत्यूपूर्वी ओशोंचे प्रवचन ऐकत असल्याचे दिसून येते. विष प्राशन करण्यापूर्वी बालेंद्रने आपल्या फोनवर पोस्ट केलेल्या स्टेटसमध्ये चिता, अंत्ययात्रा आणि ओशोंचे फोटो टाकले होते. फोटोमध्ये 'मृत्यू हेच सत्य आहे' असं लिहिलं होतं.
या घटनेनंतर कुटुंबीयांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या दोघांनी कोणत्या परिस्थितीत आत्महत्या केली याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. याप्रकरणी एसपी असीम चौधरी म्हणाले की, काल्पी कोतवाली भागात दोन मित्रांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही बाब निदर्शनास येताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. शवविच्छेदन अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल.
