पीडितेच्या तक्रारीवरून थायलंड पोलिसांनी दोन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेचा सविस्तर तपास केला असता हे भयंकर कृत्य साताऱ्यातील दोन तरुणांनी केल्याचं समोर आलं आहे. थायलंड पोलिसांनी घटनास्थळी लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे आणि काही साक्षीदारांच्या मदतीने आरोपींची ओळख पटवली असून त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. भारतीय तरुणांनी परदेशात जाऊन अशाप्रकारचं कृत्य केल्याने साताऱ्यासह महाराष्ट्राची मान शरमेनं खाली झुकली आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यातील दोनजण अलीकडेच थायलंडला फिरण्यासाठी गेले होते. थायलंडला जाताच साताऱ्याचे हे दोन्ही तरुण बेभान झाले. विदेशी धरतीवर त्यांनी एका जर्मन तरुणीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. घटनेच्या वेळी २४ वर्षीय पीडित जर्मन तरुणी थांयलंडच्या सुरत थानी प्रांतातील कोह पांगण जिल्ह्यातल्या बाण ताई उपजिल्हा गाव क्रमांक सहा येथील रीन बीचवर फिरायला आली होती. यावेळी दोघांची नजर या जर्मन तरुणीवर पडली. यानंतर आरोपींनी पीडितेसोबत जबरदस्ती करत तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
अत्याचाराच्या या घटनेनंतर संबंधित पीडित महिलेने कोह फांगन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलीय. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करत तातडीने तपासाला सुरुवात केली. यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही आणि काही साक्षीदारांच्या आधारावर दोन्ही संशयित आरोपींना अटक केली आहे. सध्या दोघांची रवानगी थायलंड येथील तुरुंगात करण्यात आली आहे. थायलंडमधील कठोर कायदे पाहता आता या दोन्ही तरुणांवर काय कारवाई होणार? ते विदेशी तरुणांत सडणार का? याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत.