Agriculture News : अतिवृष्टीचा फटका, बबन यांच्या सीताफळाचे मोठं नुकसान, खर्च निघणे झालं अवघड
- Published by:Mohan Najan
- Reported by:Ravi Shivaji Shikare
Last Updated:
अतिवृष्टीच्या पावसाचा फटका फळबागांना बसला. परिणामी सीताफळांची बाजारात आवक जास्त झाली आणि भाव कमी झाले.
छत्रपती संभाजीनगर : तालुक्यातील कुंभेफळ येथील बबन वाघ यांचा 3 वर्षांपूर्वीचा दीड एकर शेतामध्ये गोल्डन या वाणाचा सीताफळाचा बाग आहे. त्यामध्ये 550 झाडांची आठ बाय तेरा अशी लागवड आहे. गतवर्षी यातून 2 लाख रुपये उत्पन्न मिळाले होते. यंदा 12 ते 13 टन सीताफळे तयार झाले आहे. मात्र अतिवृष्टीच्या पावसाचा फटका फळबागांना बसला. परिणामी सीताफळांची बाजारात आवक जास्त झाली आणि भाव कमी झाले. त्यामुळे आता 20 रुपये किलो दराने व्यापाऱ्यांना फळ विक्री सुरू आहे. सीताफळ उत्पन्नाची अपेक्षा 4 लाख रुपयांपर्यंत होती. मात्र पावसामुळे 1.50 लाख रुपयांचे उत्पन्न निघाले आणि अडीच लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागले, असे वाघ यांनी लोकल 18 सोबत सांगितले.
कुंभेफळ येथे बबन वाघ यांनी गोल्डन या वाणाचे सीताफळ झाडांची लागवड केली कारण ते टिकाऊ आहे. आठ-दहा दिवस फळांना भाव नसला तरी हे फळ पिकत नाही आणि गळती होत नाही. म्हणून गोल्डन या वाणाची लागवड केली. तसेच यंदा उत्पन्नाची अपेक्षा दुप्पट होती. त्या अपेक्षेमुळे खर्च देखील जास्त केलेला होता. दीड एकर सीताफळ बागेला 55 हजार रुपयांपर्यंत खर्च झाला आहे. मात्र अतिवृष्टीच्या पावसामुळे आशेची निराशा झाली, असे देखील वाघ यांनी म्हटले आहे.
advertisement
अतिवृष्टीच्या पावसामुळे जवळपास सीताफळ बागेचे 2.50 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सध्या तरी खर्च निघणे अपेक्षित आहे. शासनाच्या वतीने नुकसान भरपाईसाठी मदत करायला, अशी प्रतिक्रिया देखील वाघ यांनी दिली.
view commentsLocation :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
November 04, 2025 9:15 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Agriculture News : अतिवृष्टीचा फटका, बबन यांच्या सीताफळाचे मोठं नुकसान, खर्च निघणे झालं अवघड

