Dombivli: डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात पुन्हा राडा, महिला डॉक्टरने रुममध्ये घेतलं कोंडून, VIDEO
- Published by:Sachin S
Last Updated:
तरुणाच्या नातेकवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला. त्यामुळे एका महिला डॉक्टराला स्वत: ला रुममध्ये कोंडून घेण्याची वेळ आली.
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात हा प्रकार घडला. डोंबिवलीतील शेलारनाका परिसरात राहणारा मोहम्मद हुसेन पावटे (वय २३) याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. वेळीच त्याला पाहिल्यानं त्याला खाली उतरवून त्याला शेजारी आणि नातेवाईकानी उपचारासाठी शास्त्रीनगर रुग्णालयात घेऊन आले.
त्याची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी सायन इथं पाठवलं. त्याला नेण्यासाठी रुग्णवाहिका आली. रुग्णासोबत त्याचे नातेवाईक रुग्णवाहिकेत बसले. रुग्णवाहिकेत जास्त लोक असल्याने महिला डॉक्टरने 'मी नर्स आणि पोलीस घेऊन येते' हे ऐकताच संतप्त झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकासह नागरिकांनी गोंधळ सुरू केला.
advertisement
गोंधळ पाहून महिला डॉक्टरने रुग्णालयात धाव घेतली आणि स्वत:ला कोंडून घेण्याची वेळ आली. सुरक्षा रक्षकांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यासोबतही नातेवाईक आणि नागरीकांनी अरेरावी केली. रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. परंतू, डॉक्टराची मानसिकता देखील समजणे महत्वाचे आहे. डॉक्टरने सोबत जाण्यास नकार दिला नव्हता, असं प्रशासनाचं म्हणणं आहे. मात्र या घटनेच्या व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये नातेवाईक आणि नागरिक गोंधळ करुन रुग्णालयातील डॉक्टर आणि स्टाफसोबत अरेरावी करीत शिवीगाळ करीत असल्याचं दिसून आलं आहे. या घटनेमुळे रुग्णालयात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
view commentsLocation :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
November 04, 2025 9:12 PM IST
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Dombivli: डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात पुन्हा राडा, महिला डॉक्टरने रुममध्ये घेतलं कोंडून, VIDEO

