Lagna Muhurat 2026: यंदा कर्तव्य आहे! पण.., 8 महिन्यात फक्त 55 दिवस विवाह मुहूर्त; तारखांची यादी एका क्लिकवर
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
तुळशीच्या लग्नानंतर आता पारंपरिक अर्थाने “लग्नाची घाई” सुरू झाली आहे. अनेक जण लग्न, उपनयन यांसारख्या शुभ समारंभांची योजना आखत आहेत.
मुंबई: 2025 बघता बघता संपत आला आहे. आता या वर्षाचे फक्त दोन महिने बाकी आहेत. दोन नोव्हेंबरला चातुर्मास संपला आणि तुळशी विवाहाची उत्सवमय धूम देशभरात झाली. तुळशीच्या लग्नानंतर आता पारंपरिक अर्थाने “लग्नाची घाई” सुरू झाली आहे. अनेक जण लग्न, उपनयन यांसारख्या शुभ समारंभांची योजना आखत आहेत.
यंदा म्हणजेच नोव्हेंबर 2025 ते जुलै 2026 या नऊ महिन्यांच्या काळात दाते पंचांगानुसार जवळपास 55 विवाह मुहूर्त उपलब्ध असतील, अशी माहिती आदित्य जोशी गुरुजी यांनी दिली आहे. मात्र, डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 या काळात शुक्रास्त कालावधी असल्याने त्या दोन महिन्यांत शुभ विवाह मुहूर्त नसतील. याबद्दल आदित्य जोशी गुरुजी यांनी या 9 महिन्यातील विवाह तारखा सांगितल्या आहेत.
advertisement
जोशी गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे:
1) नोव्हेंबर 2025: 22, 23, 25, 26, 27 आणि 30 नोव्हेंबर
2) डिसेंबर 2025: 2 व 5 डिसेंबर (शुक्रास्तामुळे इतर तारखांना विवाहयोग नाही)
3) फेब्रुवारी 2026: 3, 5, 6, 7, 8, 10, 11, 12, 20, 22, 25 व 26 फेब्रुवारी
4) मार्च 2026: 5, 7, 8, 12, 14, 15 व 16 मार्च
advertisement
5) एप्रिल 2026: 21, 26, 28, 29 व 30 एप्रिल
6) मे 2026: 1, 3, 6, 7, 8, 9, 10, 13 व 14 मे
7) जून 2026: 19, 20, 22, 23, 24 व 27 जून
8) जुलै 2026: 1, 2, 3, 4, 7, 8, 9 व 11 जुलै
या सर्व तारखा दाते पंचांगांनुसार शुभ मानल्या गेल्या आहेत. मात्र, 14 डिसेंबर 2025 ते 30 जानेवारी 2026 या दरम्यान शुक्राचा अस्त असल्याने या काळात कोणतेही शुभ विवाह, उपनयन किंवा गृहप्रवेशाचे कार्यक्रम टाळावेत. गुरुजींच्या मते, “जर आपत्कालीन परिस्थितीत लग्न करणे अत्यावश्यक असेल, तर आपल्या कुलगुरु किंवा पंडितांचा सल्ला घेऊनच त्या कालावधीत योग्य मुहूर्त निश्चित करावा.” तर आता तुळशी विवाहानंतर शुभ मुहूर्तांच्या हंगामाला सुरुवात झाली असून येत्या नऊ महिन्यांत लग्नसमारंभांची लगबग देशभरात पाहायला मिळणार आहे.
view commentsLocation :
Maharashtra
First Published :
November 04, 2025 9:12 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Lagna Muhurat 2026: यंदा कर्तव्य आहे! पण.., 8 महिन्यात फक्त 55 दिवस विवाह मुहूर्त; तारखांची यादी एका क्लिकवर

