मुझफ्फरपूरच्या नगर पोलीस स्टेशन हद्दीतील योगिया मठातून तीन मुली अचानक बेपत्ता झाल्या होत्या. माया, गौरी आणि माही अशी त्यांची नावं होती. याप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. मथुरेत रेल्वे ट्रॅकवर सापडलेले तीन मृतदेह याच मुलींचे असल्याचा दावा केला जात आहे, ज्या मुझफ्फरपूरमधून पळून गेल्या होत्या. मात्र, डीएनए चाचणीनंतरच याची पुष्टी होऊ शकते.
advertisement
छ. संभाजीनगरधील दोन जावई सासरवाडीला निघालेले; पण रस्त्यातच मृत्यूने गाठलं, दोघांचा दुर्दैवी शेवट
अलीकडेच तीन मुली अचानक बेपत्ता झाल्यामुळे खळबळ उडाली होती. तिघीही बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीय अतिशय चिंतेत होते. एका मुलीने तिच्या घरी पत्रही टाकलं होतं. यात लिहिलं होतं, की तिघीही हिमालय किंवा लालगंजला जात असल्याचे आहेत. त्यांचा कोणी शोध घेऊ नये, त्यांनी विष विकत घेतलं आहे. जर कोणी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला तर त्या विष पिऊन जीव देतील. पत्र वाचून कुटुंबीयांना धक्काच बसला. प्रकरणाचं गांभीर्य पाहून शहर पोलिसांनी तक्रार नोंदवून तपास सुरू केला. मुलींचं फोन लोकेशन उत्तर प्रदेश दाखवत होतं.
दरम्यान, अचानक बातमी आली की उत्तर प्रदेशातील मथुरा-आग्रा रेल्वे ट्रॅकवर मुलींचे मृतदेह सापडले आहेत. तिघांनीही हातावर मेंदी लावली होती. एका मुलीच्या हातावर मेंदीने SBG लिहिलं होतं. यासोबतच पोलिसांना कपड्यांवर 'ग्लोब टेलर मुजफ्फरपूर' असं लिहिलेले स्टिकरही सापडले. त्यामुळे या तीन मुली गौरी, मुझफ्फरपूरच्या जोगिया मठातील माया आणि बालूघाट येथील माही असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सध्या डीएनए चाचणीनंतरच पोलिसांना याची पुष्टी करता येणार आहे.
