सविस्तर प्रकरण असं की...
पीडितेचा आरोप आहे की, तिचा पती अरबाज, जो व्यवसायाने चालक आहे, त्याने तिला तिहेरी तलाक दिला. त्याने तिच्या दीड वर्षांच्या निष्पाप मुलीचाही जीव घेतला. हुंड्याच्या मागणीसाठी अरबाजने तिला तिहेरी तलाक दिला. इतकंच नाही तर त्याने दुसऱ्या महिलेशी लग्नही केलं आहे. तो तिला मारहाण करतो आणि धमक्याही देतो, असंही पीडितेने सांगितलं. पीडितेने माहिती दिली की, तिचं लग्न 5 वर्षांपूर्वी अरबाजसोबत झालं होतं. काही काळानंतर त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली, पण अरबाजने हुंड्याची मागणी पूर्ण न केल्यामुळे तिला तलाक दिला.
advertisement
पोलीस अधिकारी काय म्हणतात?
या प्रकरणी एएसपी शकुंतला रुहल यांनी कसरावद टीआयला तपास करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. एएसपी म्हणाल्या की, भीकनगावची रहिवासी असलेली पीडित नाझमीन तिच्या आईसोबत आली होती. तिचं लग्न कसरावद पोलीस स्टेशनच्या अमलाथा गावातील अरबाजसोबत झालं होतं. पीडितेचं म्हणणं आहे की, तिच्या पतीने तिला तिहेरी तलाक दिला आहे. तो हुंड्याची मागणी करायचा. त्याने तिच्या दीड वर्षांच्या मुलीलाही मारून टाकलं. कसरावद टीआयला तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तपासानंतर कायदेशीर कारवाई केली जाईल.
हे ही वाचा : मुलीचं लफडं कळलं, रागाच्या भरात बापाने केली हत्या; केमिकल्स टाकून बाॅडी पुरली शेतात, पुढे बाॅयफ्रेंडने...