नात्यापेक्षा सन्मान महत्त्वाचा! पती म्हणाला, 'वांझोटी', दिव्यांग व्यक्तीने दिलं प्रेम; विवाहित महिनेने घेतला धाडसी निर्णय 

Last Updated:

परशदेपूर गावातील नीलम नावाची युवती, 6 वर्षांपूर्वी अल्पवयात विवाहबंधनात अडकली. मात्र बाळ न झाल्यामुळे सासरच्यांनी तिला ‘वांझ’ म्हणत सतत अपमान केला. अखेर ती बहिणीकडे...

Love story Raebareli
Love story Raebareli
प्रेम आणि नात्यांच्या बंधनांना छेद देणारी एक अनोखी कहाणी सध्या रायबरेलीतून समोर आली आहे. टोमणे, अपमान आणि रोजच्या भांडणाला कंटाळून एका विवाहित महिलेने आपले वैवाहिक जीवन सोडून एका दिव्यांग तरुणाला आपला जोडीदार म्हणून निवडले आहे. ही कहाणी जितकी भावनिक आहे, तितकीच समाजाला विचार करायला लावणारी आहे की, नात्यांमध्ये सन्मान आणि आपुलकी जास्त महत्त्वाची आहे की, समाजाने निर्माण केलेल्या रूढी-परंपरा?
हे प्रकरण दिह पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परशदेपूर गावची रहिवासी असलेल्या नीलमशी संबंधित आहे. नीलमचा विवाह अवघ्या सहा वर्षांपूर्वी घुरुवारा गावातील दीपक नावाच्या तरुणाशी झाला होता. त्यावेळी नीलम अल्पवयीन होती, पण कुटुंबाच्या इच्छेनुसार तिचे लग्न झाले. नीलम सांगते की, कमी वयात लग्नाचे दुःख तिने सहन केले, पण कोणाकडेही कधी तक्रार केली नाही. वेळेनुसार सर्व काही ठीक होईल असे तिला वाटले, पण तसे झाले नाही.
advertisement
'वांझोटी' म्हणून टोमणे
लग्नाला सहा वर्षे होऊनही मूलबाळ न झाल्याने सासरच्या मंडळींनी तिला 'वांझोटी' म्हणून टोमणे मारायला सुरुवात केली. परिस्थिती इतकी बिघडली की नीलमला सासर सोडून रायबरेलीमध्ये आपल्या बहिणीकडे येऊन राहावे लागले. इथेच तिची भेट वीरेंद्र नावाच्या एका दिव्यांग तरुणाशी झाली. तो व्हीलचेअरच्या साहाय्याने जीवन जगतो. वीरेंद्रने नीलमची काळजी घ्यायला सुरुवात केली, तिला आदर देऊ लागला. हळूहळू दोघांमधील जवळीक वाढू लागली.
advertisement
बेपत्ता झाल्याची तक्रार
नीलम सांगते की, तिचा पती दीपकचा स्वभाव रोज भांडण्याचा होता. तिच्या माहेरी आणि सासरी दोन्ही ठिकाणी त्याला समजावण्यात आले, पण नीलमला परत अशा आयुष्यात जायचे नव्हते जिथे तिच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचत होती. तिने पोलीस अधीक्षकांना लेखी तक्रार दिली आणि आपल्या सासरच्या मंडळीं विरोधात तक्रार केली. यानंतर तिच्या सासरच्या मंडळींनी दालमऊ पोलीस ठाण्यात तिच्या बेपत्ता झाल्याची तक्रारही दाखल केली.
advertisement
जो माझा सन्माम करेल, त्याच्यासोबतच...
पोलिसांनी नीलमला शोधून न्यायालयात हजर केले. तिथे तिने स्पष्ट शब्दांत सांगितले की, तिला आता आपल्या पतीसोबत राहायचे नाही. तिने न्यायालयात आपल्या 164 च्या जबाबातही तीच गोष्ट पुन्हा सांगितली. आता नीलम आपल्या दिव्यांग प्रियकरासोबत स्वेच्छेने राहत आहे. नीलमची आई केश कुमारी यांनी लोकल 18 ला सांगितले की, नीलमची भेट रायबरेलीला उपचारासाठी येत असताना वीरेंद्रशी झाली आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. आता ती त्याच्यासोबतच राहण्यावर ठाम आहे. नीलम स्पष्टपणे म्हणते की, "जो माझा आदर करतो, माझी काळजी घेतो, त्याच्यासोबतच मला राहायचे आहे."
advertisement
मराठी बातम्या/क्राइम/
नात्यापेक्षा सन्मान महत्त्वाचा! पती म्हणाला, 'वांझोटी', दिव्यांग व्यक्तीने दिलं प्रेम; विवाहित महिनेने घेतला धाडसी निर्णय 
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement