पोलिसांत तक्रार करण्यापूर्वी केली आत्महत्या
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित घटना ही कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील किणी गावात घडली. संबंधित मुलगी पेठवडगाव येथील महाविद्यालयात शिक्षण घेत होती. किणी ते पेठवडगाव रोज एसटी बसने ती प्रवास करत होता. या प्रवासात एका मुलाकडून रोज त्रास दिला जात होता. तिने बुधवारी (दि. 13) रोजी दुपारी घरी येऊन आईला हा प्रकार सांगितला.
advertisement
घरात गळफास घेऊन संपवलं जीवन
'कामावरून आलो की, आपण पोलीस ठाण्यात त्या मुलाविरुद्ध तक्रार देऊ', असे आईने सांगितलं. पण कामावरून सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास आईने घरात प्रवेश केला, तर समोर घराच्या तुळईला गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या मुलीचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आहे आणि मुलीचा मृतदेह पारगाव ग्रामीण रुग्णालयात पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आला.
मुलास अटक अन् बालसुधारगृहात रवानगी
मुलीच्या आत्महत्येस कारण ठरलेल्या मुलाला पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा ताब्यात घेतले आणि कोल्हापूरातील बालन्याय मंडळात हजर केले. त्यानंतर त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. या घटनेने किणी गावातील गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आणि दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करत गुरूवारी रात्री कॅंडल मार्चही काढला.
हे ही वाचा : मित्रच बनला जानी दुष्मन, बायकोसोबत केली नको ती कृत्य, 30 वर्ष जुन्या मैत्रीचा हादरवणारा शेवट!
हे ही वाचा : लातूर हादरलं: पत्नीला पळवून नेल्याने पतीची सटकली, काकाच्या कृत्याची दिली पुतण्याला शिक्षा, आधी अपहरण केलं मग...