लातूर हादरलं: पत्नीला पळवून नेल्याने पतीची सटकली, काकाच्या कृत्याची दिली पुतण्याला शिक्षा, आधी अपहरण केलं मग...

Last Updated:

Crime in Latur: लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका तरुणाने पत्नी पळून गेल्याच्या रागातून भलताच कांड केला आहे.

News18
News18
लातूर: लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका तरुणाने पत्नी पळून गेल्याच्या रागातून भलताच कांड केला आहे. आरोपीनं पत्नीला पळवून नेल्याचा ज्याच्यावर संशय होता, त्याच्या १४ वर्षीय भाच्याचं अपहरण केलं आहे. या प्रकरणी आरोपीसह त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पत्नी पळून गेल्याचा बदला घेण्यासाठी अशाप्रकारे अल्पवयीन मुलाचं अपहरण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सुरेश बंडगर असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे. त्याच्यासह त्याच्या इतर दोन साथीदारांविरोधात निलंगा तालुक्यातील कासारसिरसी पोलीस ठाण्यात हा अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश बंडगर (रा. कासारसिरसी, ता. निलंगा) हे २१ जुलै रोजी पत्नी सविता बंडगर (वय ३९) यांच्यासह उमरगा बसस्थानकात गेले होते. ते दोघंही गावी जाण्यासाठी बसची वाट पाहत होते. तेवढ्यात लघुशंकेच्या बहाण्याने सविता बाथरुमच्या दिशेनं गेल्या आणि त्या परत आल्याच नाहीत. हा प्रकार घडल्यानंतर सुरेश यांनी उमरगा पोलिसांत पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. गावातील रोहित सूर्यवंशी यानेच आपल्या पत्नीचे अपहरण केल्याचा संशय सुरेश यांना होता. तसं त्यांनी तक्रारीत देखील म्हटलं होतं. महिनाभरानंतरही पत्नीचा शोध न लागल्याने संतप्त झालेल्या सुरेशने सूड घेण्याचा निर्णय घेतला.
advertisement
गुरुवारी (१४ ऑगस्ट) सकाळी ९ वाजता सुरेशने रोहितचा १४ वर्षीय पुतण्या कृष्णा सूर्यवंशी याचे निलंगा येथील कासारसिरसी येथील करीबस्वेश्वर विद्यालयासमोरून पांढऱ्या रंगाच्या कारमधून अपहरण केले. या कृत्यासाठी त्याने आपली दोन मुले अभिषेक आणि अजय यांची मदत घेतली. या घटनेची माहिती मिळताच कृष्णाच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. कासारसिरसी पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/लातूर/
लातूर हादरलं: पत्नीला पळवून नेल्याने पतीची सटकली, काकाच्या कृत्याची दिली पुतण्याला शिक्षा, आधी अपहरण केलं मग...
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement