मुलीने लग्नाचे दाखवले आमिष अन्...
सविस्तर वृत्त असे की, अमरावती/नागपूर येथील एका विवाह संकेतस्थळावर नितीन प्रकाश बांबाडे (वय-32, कळबंस्ते-विरतवाडी) याने बायोडाटा भरला. त्यानंतर विवाह संस्थेकडून प्रियंका विनोद लोणारे (रा. ठाणे) या मुलीचा बायोडाटा देण्यात आला. दोघांनीही एकमेकांना पसंत केलं. त्यानंतर एकमेकांशी बोलू लागले. प्रियंकाने आपण दोघे लग्न करून असंही सांगितलं. दरम्यान 6 मार्च 2025 ते 26 ऑगस्ट 2025 या दरम्याने प्रियंकाने नितीनकडून वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळ्या वेळी पैसे घेतले.
advertisement
6 लाखांची केली लूट
किरकोळ खर्चासाठी, अपेंडिस ऑपरेशनसाठी आणि एम्ब्राॅयडरीची मशीन घेण्यासाठी सुरूवातील 3 लाख 13 हजार 610 आणि दुसऱ्यावेळी 3 लाख 49 हजार, अशी एकून 6 लाख 62 हजार 610 रुपये प्रियंकाने नितीनकडून घेतली आहे. तिने ही रक्कम परत करतो म्हणून घेतली होती. मात्र ही रक्कम अजून परत केलेली नाही. त्यामुळे नितीनने पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि विविध कलमांद्वारे गुन्हे दाखल केले.
हे ही वाचा : "त्या मुलींसोबत का बोलतो", म्हणत जंगलात नेलं, लाथा-बुक्क्या अन् बेल्टनं मारलं; पोलिसांना समजलं आणि...
हे ही वाचा : दारुड्या भावांचा सैतानी खेळ! पत्नीला अश्लील शिवीगाळ, पतीच्या पोटात खुपसला चाकू; संसार आणला रस्त्यावर
