कानपूरमधील जूही परिसरात ही घटना घडली आहे. या ठिकाणी एका घरातून ओरडण्याचा आवाज शेजाऱ्यांना खूप दिवस येत होता. आधी लोकांना वाटलं की घरगुती भांडणाचा हा आवाज असेल, पण हा आवाज खूप दिवस सतत येत होता. त्यामुळे एक दिवस शेजारचे लोक एकत्र जमले आणि आवाज येणाऱ्या त्या घरी पोहोचले. तिथे एका माणसाने दरवाजा उघडला. त्याला या किंकाळ्या आणि ओरडण्याच्या आवाजाबद्दल विचारलं. उत्तर देत त्याने सांगितलं की इथं असं काहीही घडलेलं नाही. घरात लहान मुलं आहेत, त्यामुळे कधी तरी ओरडण्याचे आवाज येतात.
advertisement
लोकांनी त्याची मुलं कुठं आहेत, असं विचारलं. त्यावर मुलांची तब्येत ठीक नसल्याचं त्याने सांगितलं. हे ऐकून शेजारी तिथून निघून गेले. पण दुसऱ्या दिवशी तो माणूस कामावर गेल्यानंतर सगळे पुन्हा त्याच्या घरी पोहोचले. तेव्हा त्याच्या मुलीने दार उघडलं. लोकांनी तिला विचारलं असता ती हमसून हमसून रडू लागली. आईचं निधन झालं असून, वडील आपल्यावर बलात्कार करत असल्याची माहिती त्या मुलीने लोकांना दिली. तसेच एकदा तिचा गर्भपातही केला असंही तिने त्यांना रडत सांगितलं. हे ऐकताच उपस्थित सर्वांना धक्का बसला.
त्या सर्वांनी तत्काळ याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असता त्याने हे आरोप फेटाळून लावले आहेत. त्याने आपल्या मुलीशी असं काहीही केलं नसल्याचा दावा केला. शेजाऱ्यांनी सांगितल्यामुळे मुलीने खोटा एफआयआर दाखल केला आहे, असं त्याने त्याची बाजू मांडताना सांगितलं. मात्र सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. कोण खरं कोण खोटं हे तपासानंतरच स्पष्ट होईल. ही दुर्दैवी घटना उघडकीस झाल्यानंतर परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.