Pune News : विद्येच्या माहेरघरीच अघोरी विद्येचा बाजार! समुपदेशनाच्या नावाखाली महिलेचं MPSC परीक्षार्थीसोबत धक्कादायक काम
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Pune News : पुणे शहरात एक महिला समुपदेशनाच्या नावाखाली लुबाडणूक करत असल्याचा प्रकार अंनिसने समोर आणला आहे.
पुणे, 17 डिसेंबर (चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी) : विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यातच अघोरी विद्येच्या लागोपाठ दोन घटना समोर आल्या आहेत. एका प्रकारात तर एका महिलेनंच एमपीएससी परिक्षार्थीला समुपदेशनाच्या नावाखाली चक्क तिचे पाय धुवून पाणी प्यायला भाग पाडलं. तर तिकडे लोणीकाळभोरमध्ये आपल्या व्यावसायिक मित्राच्या मृत्यूसाठी स्मशानात पुजा बांधल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
अंनिसच्या पुढाकाराने महिलेचा भांडाफोड
पुण्यातील पाषाण भागात या भोंदू महिलेचं कॉर्पोरेट ऑफिस आहे, जिथं अंनिसने पोलिसांना घेऊन स्टिंग ऑपरेशन करून या कार्पोरेट भोंदूगिरीचा पर्दाफाश केला. वृषाली ढोले - शिरसाठ नावाची ही महिला समुपदेशनाच्या नावाखाली अनेकांची आर्थिक फसवणूक करत होती. एका एमपीएससी परीक्षार्थीला तर तिने तब्बल दीड लाखांना लुबाडले. एवढंच नाही तर उपचाराच्या नावाखाली राख खायला घालून स्वत: पाय धुवून पाणीही पायला लावलंय. याची तक्रार अंनिसकडे येताच त्यांनी चतुश्रूंगी पोलिसांना सोबत घेऊन तिच्या भोंदुगिरीचा पर्दाफाश केला.
advertisement
तिकडे लोणी काळभोरमध्ये तर चक्क स्मशानात अघोरी पुजा बांधल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला. बरं ही स्मशानातली पुजा कशासाठी तर आपल्याच व्यावसायिक मित्राचा मृत्यू व्हावा यासाठी होती. याप्रकरणी गणेश चौधरी या आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
अंनिसमुळे घटना उघडकीस
पुणे शहर हे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणी लाखो विद्यार्थी शिक्षण घेऊन अज्ञानाच्या अंधारातून प्रकाशमान होतात. मात्र, याच पुण्यात अंधश्रद्धा आणि अघोरी विद्येसारख्या घटना घडल्याने अंधश्रद्धा निर्मूलन समितीने नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वी पुणे शहरात अशा घटना अंनिसकडून उजेडात आणण्यात आल्या आहेत. मात्र, तरीही अशा घटना घडत असल्याने पोलिसांनी याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
December 17, 2023 6:19 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune News : विद्येच्या माहेरघरीच अघोरी विद्येचा बाजार! समुपदेशनाच्या नावाखाली महिलेचं MPSC परीक्षार्थीसोबत धक्कादायक काम