Navi Mumbai : नाईक-शिंदे वाद झाला तिथे जोरदार टशन, नवी मुंबईत भाजप-शिवसेनेत काँटे की टक्कर!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
राज्यातल्या 29 महानगरपालिका निवडणुकींच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. सुरूवातीच्या कलांमध्ये भाजप-शिवसेना महायुतीने राज्यात मुसंडी मारली आहे, तर नवी मुंबईमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे.
नवी मुंबई : राज्यातल्या 29 महानगरपालिका निवडणुकींच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. सुरूवातीच्या कलांमध्ये भाजप-शिवसेना महायुतीने राज्यात मुसंडी मारली आहे, तर नवी मुंबईमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे. नवी मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना वेगवेगळे लढत आहेत. या निवडणुकीदरम्यान गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री यांच्यात झालेला संघर्ष महाराष्ट्राने पाहिला आहे.
नवी मुंबई महापालिकेमध्ये एकूण 28 प्रभागांमध्ये 111 जागांपैकी भाजप 27 आणि शिवसेनाही 27 जागांवर आघाडीवर आहे, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा केवळ एक उमेदवार नवी मुंबईत आघाडीवर आहे. काँग्रेस तसंच राष्ट्रवादीला नवी मुंबईमध्ये अजून खातंही उघडता आलेलं नाहीये.
याआधी गणेश नाईक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादीचं निर्विवाद वर्चस्व होतं. मागच्या महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने 52 जागांवर तर शिवसेना 38, काँग्रेस 10, भाजप 6 आणि अपक्ष 6 उमेदवार जिंकले होते.
advertisement
नवी मुंबईमध्ये भाजप-शिवसेना यांच्यात संघर्ष असतानाच तिकडे भाजपमध्येही अंतर्गत वाद आहे. गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे यांच्यातील वाद पाहता भाजपने पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांना प्रभारी म्हणून पाठवलं होतं. दुसरीकडे अजित पवारांची राष्ट्रवादी, शिवसेना उद्धव ठाकरे तसंच काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नवी मुंबईमध्ये संघर्ष करताना दिसत आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Navi Mumbai,Thane,Maharashtra
First Published :
Jan 16, 2026 12:00 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Navi Mumbai : नाईक-शिंदे वाद झाला तिथे जोरदार टशन, नवी मुंबईत भाजप-शिवसेनेत काँटे की टक्कर!










