Sangali : पती-पत्नी झाले नगरसेवक, उधळला विजयी गुलाल, सांगली पालिकेत काँग्रेसचा जलवा, विजयी उमेदवारांची यादी
- Published by:Sachin S
Last Updated:
अवघ्या तासांभरामध्ये विजयी उमेदवाराची नाव समोर आली आहे. शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी गटाने बाजी मारली आहे.
सांगली: संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या सांगली महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. अवघ्या तासांभरामध्ये विजयी उमेदवाराची नाव समोर आली आहे. शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी गटाने बाजी मारली आहे. विशेष म्हणजे, एकाच घरात दिलेल्या दोन उमेदवारांचा विजय झाला आहे. काँग्रेसकडून पती आणि पत्नीला तिकीट देण्यात आलं होतं. दोन्ही नवरा-बायको विजयी झाले आहे.
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेसाठी ७८ जागांसाठी निवडणूक लढवली जात आहे. सकाळी १० वाजेपासून मतमोजणी सुरू झाली. टपाली मतदानाचा कल हाती आल्यानंतर मुख्य ईव्हीएम मशीनची मतमोजणी सुरू झाली. पण, टपाली मतदानाच्या वेळी निवडणूक कर्मचाऱ्यांचा गलथान कारभार पाहण्यास मिळाला. जवळपास तासाभराने मतमोजणी सुरू झाली. आता निकालाचा पहिला कल हाती आहे. मिरजेच्या प्रभाग क्रमांक 5 मधून काँग्रेसकडून संजय मेंढे आणि त्यांच्या पत्नी बबिता मेंढे या दाम्पत्याला तिकीट दिलं होतं. या दाम्पत्याने दणदणीत विजय मिळवला आहे. विजयानंतर या विजयी उमेदवार जोडीने एकच जल्लोष केला. तर दुसरीकडे भाजप, शिवसेने शिंदे गट आणि काँग्रेसनेही दणदणीत आघाडी घेतली आहे.
advertisement
सांगली महापालिकेत विजयी उमेदवारी यादी
प्रभाग 3 मधून भाजपाचे संदीप आवटी विजयी
मिरजेच्या प्रभाग क्रमांक 5 मधून काँग्रेसचे संजय मेंढे व बबिता मेंढे पती-पत्नी विजयी
प्रभाग क्रमांक 5 मधून काँग्रेसचे करण जामदार विजयी
मिरज प्रभाग 3 मधून शिवसेना शिंदे गटाचे सागर वनखंडे विजयी
प्रभाग क्रमांक 3 मधून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या रेश्मा चौधरी विजयी
advertisement
प्रभाग 3 मधून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या शैला दुर्वे विजयी
सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निकाल - 20 /78
भाजप - 9
शिवसेना - 1
राष्ट्रवादी AP - 4
शिवसेना UBT - 00
मनसे - 00
राष्ट्रवादी SP - 00
काँग्रेस - 6
इतर - 00
दरम्यान, सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेसाठी सरासरी 60 टक्के मतदान झालं आहे. सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू होती. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची मतदानाची एकूण टक्केवारी हाती आली नसली तरी सरासरी 60 टक्के मतदान झाल्याचे अंदाज वर्तवण्यात येत आहे. तर 2018 साली झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये 62.17 टक्के मतदान झाले होते. यंदाच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी घटल्याची शक्यता असल्याने सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Sangli Miraj Kupwad,Sangli,Maharashtra
First Published :
Jan 16, 2026 12:00 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sangali : पती-पत्नी झाले नगरसेवक, उधळला विजयी गुलाल, सांगली पालिकेत काँग्रेसचा जलवा, विजयी उमेदवारांची यादी









