दोन महिन्यांपूर्वीच प्रेमला मुलगी झाली. याचा आनंद साजरा करण्याऐवजी पत्नी माहेरी गेली आणि परतलीच नाही. शिमगा सणासाठी बोलावले तरी ती न आल्याने प्रेम तणावात बुडाला. आईच्या मृत्यूनंतर आजीच्या सांभाळात वाढलेल्या प्रेमाची ओढ फक्त पत्नी आणि मुलीची होती. आत्महत्येपूर्वी प्रेमने व्हिडिओ देखील बनवला आहे.
महानगरपालिकेत नोकरीचं आमिष अन् 43 जणांसोबत 33 लाखांचा 'गेम'; मुंबईत काय घडलं?
advertisement
ऑडिओ संदेशातील हृदयस्पर्शी शब्द
प्रेमने पत्नीला गोसावी भाषेत दोन ऑडिओ पाठवले. त्यात म्हटले, तू जे ऐकून करतेयस, स्वतःच्या पायावर धोंडा मारतेयस. मी किती दिवस फोन करतो, लेकराचं तोंड दाखवत नाहीस. तू आपलं देव सोडून दुसऱ्याकडे जातेयस. आईचं ऐकतेयस, माझ्या शब्दांना मान देत नाहीस. मी या जगात नसणार, लेकराला चांगलं सांभाळ. त्याला वळण लाव. माझ्यात चूक असेल तर पाया पडतो, पण दुसऱ्याचं ऐकू नकोस. माझ्या मातीला येऊ नको! हे शब्द ऐकत नातेवाईकांच्या डोळ्यात पाणी तरळले. प्रेमच्या पश्चात आजी, भाऊ आणि विवाहित बहीण उरली. रविवारी दुपारी शवविच्छेदनानंतर तालुका पोलिस ठाण्याचे गजानन स्वामी यांनी मृतदेह सोडला.






