TRENDING:

चालत्या ट्रेनमध्ये 6 महिन्यांचा बाळाला तरुणाच्या हातात दिलं, टॉलेटला गेली महिला, परत येताच जे दिसलं ते पाहून हादरली आई

Last Updated:

लांबच्या प्रवासात आपल्यासोबत प्रवास करणाऱ्या लोकांवर अनेक लोक हळूहळू विश्वास ठेवू लागतात आणि हे अगदी सामान्य आहे. कधीकधी गरजे प्रसंगी आपल्या बाजूला बसलेलेच प्रवासी मदत करतात. याबद्दलचे अनुभव देखील अनेकांना आले असतील.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : रेल्वे प्रवासामध्ये लोकांशी बोलणं, ओळख करून घेणं, थोडंफार विश्वास ठेवणं ही गोष्ट तशी सामान्य झाली आहे. तसे पाहाता लोक रेल्वे प्रवासात जास्त सतर्क असतात. पण लांबच्या प्रवासात आपल्यासोबत प्रवास करणाऱ्या लोकांवर अनेक लोक हळूहळू विश्वास ठेवू लागतात आणि हे अगदी सामान्य आहे. कधीकधी गरजे प्रसंगी आपल्या बाजूला बसलेलेच प्रवासी मदत करतात. याबद्दलचे अनुभव देखील अनेकांना आले असतील.
AI Generated Photo
AI Generated Photo
advertisement

लोक प्रवासात आपल्यासोबत बसलेल्या अनोळखी लोकांशी गप्पा मारताना. वेळ कसा जातो ते कळत नाही. पण कधी कधी हा विश्वास फार महागातही पडू शकतो. अशाच एका घटनेनं एका आईचं आयुष्यच उद्ध्वस्त केलं आहे.

ही घटना 23 ऑगस्टची आहे. रेनू देवी नावाची महिला कोटा ते पटना अशा प्रवासात होती. तिच्यासोबत तिचं फक्त 6 महिन्यांचं बाळही होतं. प्रवासादरम्यान तिची एका अनोळखी तरुणाशी ओळख झाली. बोलता बोलता त्यांच्यात साधी मैत्री झाली. काही वेळानंतर रेनूला शौचालयाला जायचं होतं. तिने त्या तरुणावर विश्वास ठेवत आपलं बाळ त्याच्या हातात दिलं आणि ती काही वेळासाठी गेली.

advertisement

परंतु जेव्हा ती परत आली तेव्हा तिथं तिचं बाळ आणि तो तरुण नव्हता. ट्रेन पटना जंक्शनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 10 वर उभी होती. प्रवासी उतरत होते पण बाळ घेतलेला तरुण गायब झाला होता. रेनू देवीने घाईघाईने शोधाशोध केली पण काहीच पत्ता लागला नाही.

advertisement

त्यानंतर रेल्वे पोलिसांना कळवण्यात आलं. सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता लाल टोपी घातलेला एक तरुण बाळाला हातात घेऊन घाईघाईनं प्लॅटफॉर्मवरून जाताना दिसला. या घटनेनंतर रेनू देवीचा आक्रोश उसळला आहे. तिने पोलिसांकडे फिर्याद दिली असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

घटनेनंतर महिलेने युवक आणि बाळाची प्लॅटफॉर्मवर बराच शोध घेतला, पण काहीच यश मिळालं नाही. नंतर रेल्वे पोलिसांनी स्टेशनवर लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली, ज्यामध्ये लाल टोपी घातलेला युवक बाळाला घेऊन घाईघाईने निघून जाताना दिसला. या प्रकरणात पीडित महिलेने 24 ऑगस्ट रोजी पाटणा रेल्वे ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सध्या रेनू देवी पाटणा पोलिस स्टेशनला आहेत आणि प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मक्याचे दर पुन्हा गडगडले, सोयाबीन आणि कांद्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

या घटनेनंतर पीडितेचे कुटुंबीय अत्यंत दुःखी आहेत. पीडिता सतत रडत असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, पीडितेच्या गावकऱ्यांनी आणि नातेवाईकांनी रेल्वे पोलिसांकडे आरोपी युवकाला लवकरात लवकर अटक करून बाळाला सुरक्षितपणे परत मिळवून देण्याची मागणी केली आहे.

मराठी बातम्या/क्राइम/
चालत्या ट्रेनमध्ये 6 महिन्यांचा बाळाला तरुणाच्या हातात दिलं, टॉलेटला गेली महिला, परत येताच जे दिसलं ते पाहून हादरली आई
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल