TRENDING:

Beed News: लहानपणीचा तो वाद, 20 वर्षांचा राग, मित्राचाच गेम केला, बीडला हादरवणाऱ्या प्रकरणाला धक्कादायक वळण

Last Updated:

Beed News: चौकशीत धक्कादायक कबुली देत, लहानपणी झालेल्या भांडणांमुळे हर्षद यांच्याविषयी मनात द्वेष निर्माण झाला होता, असे आरोपीने सांगितले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बीड: गेल्या काही काळात बीड जिल्हा गुन्हेगारी घटनांमुळे चर्चेत आहे. नुकतेच शहरातील अंकुशनगर परिसरात घडलेल्या खुनामागचं धक्कादायक कारण पोलीस तपासातून पुढं आलं आहे. बालपणी झालेल्या किरकोळ भांडणाचा राग मनात होता. त्यामुळे जवळपास 15 ते 20 वर्षांनंतर एका मित्रानेच मित्राचा निर्घृण खून केल्याची बाब उघड झाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण असून, जुन्या वादातून इतका टोकाचा निर्णय घेतल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.
Beed News: लहानपणीचा तो वाद, 20 वर्षांचा राग, मित्राचाच गेम केला, बीडला हादरवणाऱ्या प्रकरणाला धक्कादायक वळण
Beed News: लहानपणीचा तो वाद, 20 वर्षांचा राग, मित्राचाच गेम केला, बीडला हादरवणाऱ्या प्रकरणाला धक्कादायक वळण
advertisement

नगरपालिकेत कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले हर्षद शिंदे (वय 38) हे मंगळवारी (दि.6) दुपारी अंकुशनगर भागात सुरू असलेल्या पाईपलाईनच्या कामावर उपस्थित होते. त्याच वेळी विशाल उर्फ बप्या सूर्यवंशी हा अचानक तेथे आला. आरोपीने जवळ बाळगलेल्या पिस्टलमधून हर्षद यांच्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र गोळी न लागल्याने हर्षद यांनी जीव वाचवण्यासाठी धाव घेतली. यानंतर आरोपीने त्यांचा पाठलाग करत धारदार शस्त्राने वार करून त्यांची जागीच हत्या केली.

advertisement

संभाजीनगर हादरलं! सकाळी शेतात गेला, तो परतालच नाही, माजी सरपंचाच्या मुलासोबत संक्रांतीलाच भयंकर घडलं

भरदुपारी घडलेल्या या रक्तरंजित घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांमध्ये भीती पसरली तर घटनास्थळी मोठी गर्दी जमली. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे एक विशेष पथक तातडीने तैनात करण्यात आले. चार दिवसांच्या कसून शोधमोहिमेनंतर रविवारी (दि.11) आरोपीला केजकडे येत असताना दुचाकीसह ताब्यात घेण्यात आले.

advertisement

View More

अनेक दिवसांचा राग

आरोपीला सोमवारी (दि.12) न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. चौकशीत आरोपीने धक्कादायक कबुली देत, लहानपणी झालेल्या भांडणांमुळे हर्षद यांच्याविषयी मनात द्वेष निर्माण झाला होता, असे सांगितले. अनेक वर्षे हा राग मनात दडपून ठेवून, त्यातूनच खुनाचा कट रचल्याचे त्याने मान्य केले आहे. घटनेच्या दिवशी आरोपी दारूच्या नशेत असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
बिग बॉस मराठीत काळू डॉनची हवा, पण कुटुंबाचं भयाण वास्तव पाहिलं का? Video
सर्व पहा

दरम्यान, या गुन्ह्यात वापरण्यात आलेली पिस्टल आरोपीकडे कुठून आली? ती देशी की विदेशी बनावटीची आहे, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. शस्त्रपुरवठ्याचा साखळी तपास सुरू असून, आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचाही शोध घेतला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

मराठी बातम्या/क्राइम/
Beed News: लहानपणीचा तो वाद, 20 वर्षांचा राग, मित्राचाच गेम केला, बीडला हादरवणाऱ्या प्रकरणाला धक्कादायक वळण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल