संबंधित व्हिडीओत आरोपी गावगुंड अश्लील शब्दात शिवीगाळ करत शेतकरी दाम्पत्याला मारहाण करताना दिसत आहे. यावेळी एका आरोपीनं महिलेला अश्लील शिवीगाळ करत मारहाण केली. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने महिलेच्या कॉलर पकडून तिचा विनयभंग देखील केला. तर इतर आरोपींनी महिलेच्या पतीला शेतात पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बीडच्या अंजनवती गावात घडली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ समोर आला आहे. या प्रकरणात श्रीमंत येडे यांच्या फिर्यादीवरून नेकनूर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जमीनीच्या वादातून ही मारहाण झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. शेतीची मशागत करताना किरकोळ वाद झाला. यानंतर या वादाचं रुपांतर मारहाणीत झाल्याचं सांगितलं जात आहे.
याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. एकीकडे बीड जिल्ह्यात मारहाणीच्या विविध घटना घडत असताना अंजनवती गावात घडलेल्या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बीडमध्ये आरोपींना कायद्याचा धाक उरला आहे का नाही? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
