चीज बॉल्स लागणारे साहित्य
उकडलेले बटाटे – 3 ते 4 (मध्यम आकाराचे)
किसलेले चीज (मोझरेला / प्रोसेस्ड) – ½ कप
कॉर्नफ्लोअर – 2 टेबलस्पून
ब्रेडक्रम्ब्स – ½ कप
हिरवी मिरची – 1 (बारीक चिरलेली)
मीठ – चवीनुसार
ओवा / मिक्स हर्ब्स – ½ टीस्पून (ऐच्छिक)
तेल – तळण्यासाठी
कोटिंगसाठी:
मैदा – 2 टेबलस्पून
advertisement
पाणी – आवश्यकतेनुसार
ब्रेडक्रम्ब्स – ½ कप
चीज बॉल्स कृती
उकडलेले बटाटे सोलून नीट मॅश करून घ्या. त्यात किसलेले चीज, हिरवी मिरची, आले-लसूण पेस्ट, काळी मिरी, मीठ, कॉर्नफ्लोअर आणि हर्ब्स घालून सर्व मिश्रण नीट एकत्र करा. मिश्रणाचे छोटे-छोटे गोळे तयार करा. त्या गोळ्यात बारीक केलेले चीज टाका आणि गोलसर वळून घ्या. एका वाटीत मैदा आणि पाणी एकत्र करून पातळ मिश्रण तयार करा. प्रत्येक गोळा आधी मैद्याच्या मिश्रणात बुडवून मग ब्रेडक्रम्ब्समध्ये घोळवा. कढईत मध्यम आचेवर तेल गरम करा. गोळे सोनेरी रंगाचे आणि खुसखुशीत होईपर्यंत तळा.
टिश्यू पेपरवर काढून अतिरिक्त तेल काढून टाका.
Social Media वर व्हायरल, मसाला पायनापल रेसिपी, घरीच बनवा सोप्या पद्धतीनं Video
सर्व्ह कसे करावे:
गरमागरम पोटॅटो चीज बॉल्स टोमॅटो सॉस, मेयोनीज किंवा मिंट चटणीसोबत सर्व्ह करा.
खास टिप्स:
बॉल्स अधिक क्रिस्पी हवेत तर डबल कोटिंग करा. मुलांसाठी कमी तिखट ठेवू शकता. हेल्दी पर्यायासाठी हे बॉल्स एअर फ्रायर किंवा ओव्हनमध्येही करता येतात. हा झटपट, चवदार आणि सगळ्यांना आवडणारा नाश्ता नक्की करून पाहा.





