Matar Pulao recipe : घरच्या घरी बनवा परफेक्ट आलू-मटर पुलाव, हा रॉकेट सायन्स नाही फक्त 10 मिनिटात तयार

Last Updated:
घरामध्ये पाहुणे येणार असोत किंवा डब्यासाठी काहीतरी खास बनवायचं असतं, ताटात जेव्हा वाफाळलेला पुलाव येतो, तेव्हा जेवणाची रंगत आपोआप वाढते.
1/7
ऑफिसमधून थकून घरी आल्यावर किंवा सुट्टीच्या दिवशी दुपारी काहीतरी चमचमीत पण झटपट बनावं असं वाटत असेल, तर डोळ्यांसमोर येणारं पहिलं नाव म्हणजे 'पुलाव'. पुलाव हा असा पदार्थ आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीचा आहे. घरामध्ये पाहुणे येणार असोत किंवा डब्यासाठी काहीतरी खास बनवायचं असतं, ताटात जेव्हा वाफाळलेला पुलाव येतो, तेव्हा जेवणाची रंगत आपोआप वाढते.

advertisement
2/7
बिर्याणीपेक्षा हलका आणि साध्या भातापेक्षा चविष्ट असा हा 'आलू-मटर पुलाव' भारतीय स्वयंपाकघरातील एक अविभाज्य भाग आहे. चला तर मग, आज जाणून घेऊया अगदी हॉटेलसारखा सुटसुटीत आणि सुगंधी आलू-मटर पुलाव घरच्या घरी कसा बनवायचा, याची सोपी रेसिपी.

3/7
भारतात उत्तर असो वा दक्षिण, पुलावाचे वेड सर्वत्र सारखेच आहे. पनीर पुलाव, जिरा राईस, शाही पुलाव अशा अनेक प्रकारांमध्ये 'आलू-मटर पुलाव' हा सर्वात लोकप्रिय आहे. कारण यातील साहित्य आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असतं.  गृहिणी मनीषा सिंग सांगतात की,
भारतात उत्तर असो वा दक्षिण, पुलावाचे वेड सर्वत्र सारखेच आहे. पनीर पुलाव, जिरा राईस, शाही पुलाव अशा अनेक प्रकारांमध्ये 'आलू-मटर पुलाव' हा सर्वात लोकप्रिय आहे. कारण यातील साहित्य आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असतं. गृहिणी मनीषा सिंग सांगतात की, "रात्रीच्या वेळी जेव्हा काहीतरी हलकं पण चविष्ट खाण्याची इच्छा होते, तेव्हा आलू-मटर पुलाव हा सर्वोत्तम पर्याय ठरतो."
advertisement
4/7
साहित्यबासमती तांदूळ, बटाटे (तुकडे केलेले), ओले मटार. कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, आले-लसूण पेस्ट.
खडा मसाला: तमालपत्र, दालचिनी, मोठी व छोटी वेलची, हिंग, जिरे.
पावडर मसाले: हळद, लाल तिखट, गरम मसाला, बिर्याणी मसाला, मीठ.
इतर: तेल, लिंबाचा रस, ताजी कोथिंबीर.
साहित्यबासमती तांदूळ, बटाटे (तुकडे केलेले), ओले मटार. कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, आले-लसूण पेस्ट.खडा मसाला: तमालपत्र, दालचिनी, मोठी व छोटी वेलची, हिंग, जिरे.पावडर मसाले: हळद, लाल तिखट, गरम मसाला, बिर्याणी मसाला, मीठ.इतर: तेल, लिंबाचा रस, ताजी कोथिंबीर.
advertisement
5/7
स्टेप-बाय-स्टेप रेसिपी : हॉटेलसारखा पुलाव आता घरी1. पुलाव बनवण्यापूर्वी तांदूळ स्वच्छ धुवून किमान अर्धा तास पाण्यात भिजत ठेवा. यामुळे पुलाव छान मोकळा आणि लांब सडक होतो.
2. खड्या मसाल्यांची फोडणी: कुकरमध्ये तेल गरम करा. तेल तापलं की त्यात तमालपत्र, दालचिनी, वेलची आणि हिंग घाला. मसाल्यांचा सुगंध सुटू लागला की त्यात जिरे टाका.
स्टेप-बाय-स्टेप रेसिपी : हॉटेलसारखा पुलाव आता घरी1. पुलाव बनवण्यापूर्वी तांदूळ स्वच्छ धुवून किमान अर्धा तास पाण्यात भिजत ठेवा. यामुळे पुलाव छान मोकळा आणि लांब सडक होतो.2. खड्या मसाल्यांची फोडणी: कुकरमध्ये तेल गरम करा. तेल तापलं की त्यात तमालपत्र, दालचिनी, वेलची आणि हिंग घाला. मसाल्यांचा सुगंध सुटू लागला की त्यात जिरे टाका.
advertisement
6/7
5. आता यात बटाट्याचे फोडी आणि मटार घालून मसाल्यात चांगले मिक्स करा. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून उकळी येऊ द्या. पाणी उकळायला लागलं की भिजवलेले तांदूळ अलगद हाताने टाका (तांदूळ तुटणार नाहीत याची काळजी घ्या).6. कुकरचं झाकण बंद करा आणि मध्यम आचेवर फक्त दोन शिट्ट्या होऊ द्या. कुकरचा प्रेशर पूर्णपणे निघून गेल्यावरच झाकण उघडा. वरून थोडा लिंबाचा रस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाका.

7/7
कशासोबत खाणार?हा गरमागरम आलू-मटर पुलाव तुम्ही बुंदी रायता, थंड दही, पापड किंवा लोणच्यासोबत खाऊ शकता. हॉटेलसारखा सुगंध आणि घरचा शुद्धपणा यामुळे हा पुलाव तुमच्या घरातील सर्वांचे मन जिंकेल यात शंका नाही.

Santosh Dhuri On MNS : महापालिका निवडणुकीत मनसेची धूळदाण, संतोष धुरींचा पहिला वार; "उद्धव ठाकरेंनी मनसेला..."
महापालिका निवडणुकीत मनसेची धूळदाण, संतोष धुरींचा पहिला वार; "उद्धव ठाकरेंनी मनसे
  • महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

  • भाजपमध्ये प्रवेश केलेले नेते संतोष धुरी यांनी मनसेच्या कामगिरीवर आणि रणनीतीवर पह

  • संतोष धुरी यांचा उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप...

View All
advertisement