Social Media वर व्हायरल, मसाला पायनापल रेसिपी, घरीच बनवा सोप्या पद्धतीनं Video
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Mohan Najan
Last Updated:
सध्या सोशल मीडियावर मसाला पायनापलची रेसिपी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तरी ही रेसिपी कशी करायची याची सोपी रेसिपी आपल्याला ऋतुजा पाटील यांनी सांगितली आहे.
छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियावर दररोज कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा ट्रेंड असतो. कधी फॅशनचा, कधी खाण्यापिण्याच्या गोष्टींचा. त्यापैकीच एक ट्रेंड म्हणजे मसाला पायनापल. सध्या सोशल मीडियावर मसाला पायनापलची रेसिपी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तरी ही रेसिपी कशी करायची याची सोपी रेसिपी आपल्याला ऋतुजा पाटील यांनी सांगितली आहे.
मसाला पायनापलसाठी लागणारे साहित्य
चार ते पाच अननसाच्या काप, लाल तिखट, जिरे पूड, काळे मीठ, चाट मसाला, मीठ, लिंबाची फोड, एवढे साहित्य लागेल.
मसाला पायनापल कृती
सर्वप्रथम एका भांड्यामध्ये अननसाच्या फोडी टाकून घ्यायच्या. त्यानंतर त्यामध्ये लाल तिखट टाकायचं. लाल तिखट हे तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता म्हणजे की तुम्हाला जेवढे तिखट लागते त्याप्रमाणे. त्यानंतर यामध्ये चाट मसाला टाकून घ्यायचा अर्धा चमचा. त्यानंतर जिरेपूड टाकायची पाऊण चमचा. त्यानंतर काळं मीठ चवीनुसार आणि आपलं जे रेगुलर मीठ असतं ते पण चिमूटभर टाकायचं आणि यावरती आपण जी लिंबाची फोड घेतली होती ती टाकून घ्यायची. हे सर्व एकत्र पूर्ण एकजीव करायचं आणि ते सर्व अननसाच्या फोडीला लागेल त्याप्रमाणे एकजीव करून घ्यायचं.
advertisement
अशा पद्धतीने आपलं हे मसाला पायनापल घरी बनवून तयार होते. अगदी झटपट आणि मोजून पाच मिनिटांमध्ये रेसिपी बनवून तयार होते. तर तुम्ही देखील घरी नक्की ट्राय करा.
Location :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
Jan 17, 2026 2:25 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
Social Media वर व्हायरल, मसाला पायनापल रेसिपी, घरीच बनवा सोप्या पद्धतीनं Video
title=घरी करा हे झटपट होणारे मसाला पायनापल रेसिपी 






