KDMC Thackeray Winning List: कल्याण - डोंबिवलीत चमत्कार घडला, ठाकरेंचे 11 शिलेदार आले निवडून ; वाचा संपूर्ण यादी
- Published by:Prachi Amale
Last Updated:
कल्याण डोंबिवलीत ठाकरेंच्या उमेदवारांना निवडणुकीत वरिष्ठांकडून पाठिंबा आणि मदतही मिळाली नाही, त्यानंतरही उमेदवार निवडून आले आहेत.
ठाणे : कल्याण - डोंबिवली महापालिका निवडणुकीत महायुतीने एकहाती वर्चस्व राखत विजयाचा झेंडा फडकावला आहे. शिवसेना शिंदे गटाने सर्वाधित जिंकत महायुतीत आघाडी घेतली असून भाजप दुसऱ्या क्रमांकावर राहिला. त्यामुळे महायुतीचा महापौरपद आणि सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला. मात्र उद्धव ठाकरेंच्या पक्षाने देखील मोठी भूमिका बजावली असून ठाकरेंचे तब्बल 11 नगरसेवक निवडून आले आहे.
कल्याण डोंबिवलीत 122 जागांपैकी शिवसेनेने 52 तर भाजपने 51 जागा जिंकल्या आहेत महापालिकेत सत्तास्थापनेसाठी 62 जागांची गरज असताना महायुतीतील दोन्ही पक्षांना स्वतंत्रपणे हा आकडा गाठता आला नाही. हे दोन्ही पक्ष महापौरपदासाठी अडून बसल्यास शिवसेना उबाठाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. कारण कल्याण डोंबिवलीत ठाकरेंच्या शिवसेनेचे तब्बल 11 नगरसेवक निवडून आले होते. तर मनसेचे 5 नगरसेवक निवडून आले आहेत. दुसरीकडे मनसे आणि ठाकरेंच्या उमेदवारांना निवडणुकीत वरिष्ठांकडून पाठिंबा आणि मदतही मिळाली नाही, त्यानंतरही उमेदवार निवडून आले आहेत.
advertisement
सत्तेच्या सारीपाटात हे नगरसेवक आपल्या पूर्वीच्या पक्षाशी तडजोड करणार का?
वास्तविक युतीमुळे उमटलेल्या नाराजीतूनच अनेकांनी शिवसेना उबाठा आणि मनसेचा आधार घेत उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या उमेदवारांना पुन्हा एकदा मतदारांनी स्वीकारल्याने आता सत्तेच्या सारीपाटात हे नगरसेवक आपल्या पूर्वीच्या पक्षाशी तडजोड करणार का, हे पहावे लागेल. यापूर्वी झालेल्या निवडणुकीतदेखील मनसेला 9 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे महापौरपदासाठी शिवसेना भाजपमध्ये रंगलेल्या स्पर्धेत मनसेची भूमिका महत्त्वाची ठरली होती.
advertisement
| विजयी नगरसेवकांची नावे |
| उमेश बोरगांवकर |
| संकेश भोईर |
| स्वप्निल केने |
| अपर्णा भोईर |
| विशाल गारवे |
| वंदना महिले |
| तेजश्री गायकवाड |
| संकेश भोईर |
| विशाल गारवे |
| मधुर म्हात्रे |
| खंबायत अशोक |
advertisement
मनसेने तटस्थ भूमिका घेत शिवसेनेला सहकार्य केल्याने त्यांचा महापौरपदाचा मार्ग सुकर झाला होता. मात्र यावेळी शिवसेना आणि भाजप यांच्यात वरवर मैत्री दिसत असली तरी त्यांच्यातील वाद उफाळून आले असून प्रभाग क्रमांक 29 मध्ये झालेल्या लढतीत हे वाद प्रकर्षाने दिसून आले यामुळे सत्तास्थापनेत हे वाद उफाळून येणार की मैत्रिपूर्ण सत्ता अबाधित राहणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. महायुतीच्या दोन्ही पक्षांचे एकट्याच्या बळावर जादूई आकडा गाठण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले, त्यामुळे महापौरपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
advertisement
Location :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
Jan 17, 2026 2:10 PM IST
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
KDMC Thackeray Winning List: कल्याण - डोंबिवलीत चमत्कार घडला, ठाकरेंचे 11 शिलेदार आले निवडून ; वाचा संपूर्ण यादी






