TRENDING:

प्रेयसीचं लग्न ठरलं दुसऱ्याशी, प्रियकराने टाळी लागण्याआधी ठेवले जबरदस्ती शारीरिक संबंध, हादरवणारी घटना

Last Updated:

physical relation crime news - लग्नाच्या दिवशी प्रियकराने आपल्याच प्रेयसीसोबत जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले. असा आरोप एका विवाहितेने केले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
राजकोट - गेल्या काही दिवसात अनैतिक संबंधातून हत्या आत्महत्या तसेच बलात्काराच्या घटना समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकराने आपल्या प्रेयसीसोबत अत्यंत धक्कादायक कृत्य केले. राजकोटमधून ही घटना समोर आली आहे.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

लग्नाच्या दिवशी प्रियकराने आपल्याच प्रेयसीसोबत जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले. असा आरोप एका विवाहितेने केले आहे. या 25 वर्षीय विवाहित तरुणीने आपल्या प्रियकरावर गंभीर आरोप करत गांधीग्राम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. बलात्कार, जीवे मारण्याची धमकी आणि इतर गंभीर कलमांखाली आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे संपूर्ण घटना -

advertisement

या विवाहित तरुणीने आपल्या तक्रारीत असे म्हटले की, 2021 मध्ये एका लग्नादरम्यान विरामसोबत तिची भेट झाली होती. आधी त्याने फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि मग नंतर व्हाट्सअपवर संवाद करत दोघांमध्ये जवळीक वाढवली. दोन वर्षांपूर्वी विरामने विरामने तिला आपल्या बोलेरो गाडीत बसण्यासाठी बोलावले आणि तिला दारू पाजून बेशुद्ध केले. यानंतर ती बेशुद्ध असताना विरामने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले आणि त्याचा व्हिडिओही बनवला. यानंतर त्याने या व्हिडिओचा आधार घेत तिला धमकी देत वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. विरामने तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवून तिचा मानसिक छळ केला असा आरोप केला आहे.

advertisement

वर-वधूला लग्नात हळदी अन् मेहंदी का लावली जाते, अनेकांना माहिती नसेल यामागचं कारण

लग्नाच्या दिवशी धमकी -

तिने पुढे म्हटले की, 28 एप्रिल 2024 रोजी तिचे आणि तिच्या भावाचे लग्न झाले होते. त्यादिवशी विरामचा व्हॉट्सअप कॉल होता. तो घरी येत असल्याचे त्याने सांगितले. तिने विरोध केला असताना त्या व्हिडिओ कॉल करण्याचा आणि भावाचे लग्न मोडण्याची धमकी दिली. त्यानंतरही विरामने तिला भेटायला बोलावले आणि तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. यानंतर त्याने आपल्या मोबाईलमध्ये तिचे फोटो सोडून निघून गेला.

advertisement

तसेच लग्नानंतर माहेरी आल्यावरही त्याने तिला त्रास दिला आणि जबरदस्तीने पुन्हा शारीरिक संबंध ठेवले. तिच्या पतीला याबाबत माहिती झ्लायवर त्याने विरामला संपर्क करुन हा सर्व प्रकार थांबवण्यास सांगितले. मात्र, त्याने तिच्या पतीलाही धमकी दिली. यानंतर तरुणीच्या पतीने तिच्या भावाशी संपर्क साधत तिला माहेरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला.

मराठी बातम्या/क्राइम/
प्रेयसीचं लग्न ठरलं दुसऱ्याशी, प्रियकराने टाळी लागण्याआधी ठेवले जबरदस्ती शारीरिक संबंध, हादरवणारी घटना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल