वर-वधूला लग्नात हळदी अन् मेहंदी का लावली जाते, अनेकांना माहिती नसेल यामागचं कारण
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
haldi uses tradition marriage - एक महत्त्वाची परंपरा म्हणजे हळद आणि मेहंदी लावणे. लग्नात हळद आणि मेहंदी का लावतात किंवा ही परंपरा नेमकी काय आहे, हे अनेकांना माहिती नसेल. तर मग यामागची परंपरा काय आहे, हेच आपण जाणून घेऊयात.
अहमदाबाद : कार्तिकी एकदशीनंतर लग्न मुहुर्तांना सुरुवात होते. भारतीय लग्न म्हटल्यावर वेगवेगळ्या पंरपरा निभावल्या जातात. यातच एक महत्त्वाची परंपरा म्हणजे हळद आणि मेहंदी लावणे. लग्नात हळद आणि मेहंदी का लावतात किंवा ही परंपरा नेमकी काय आहे, हे अनेकांना माहिती नसेल. तर मग यामागची परंपरा काय आहे, हेच आपण जाणून घेऊयात.
आंतरराष्ट्रीय ज्योतिषी आणि वास्तू तज्ञ रविभाई जोशी यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, लग्नाच्या एक-दोन दिवस आधी वधूच्या हातावर तिच्या भावी पतीच्या नावाने मेंदी लावण्याचा विधी आहे. काही ठिकाणी वराच्या हातावरही मेहंदी लावली जाते. ही मेहंदी शुभ आणि शोभा वाढवणारी मानली जाते. या मेहंदी विधीमुळे वधू-वरांचे सौंदर्य वाढते आणि लग्नाचे वातावरण रंगतदार बनते.
advertisement
शास्त्रात मेहंदीचे महत्त्व -
शास्त्रांनुसार, मेंहदीचे झाड हे नकारात्मक ऊर्जा आणि वाईट नजरेपासून सुरक्षित ठेवण्यास मदत करतो असे मानले जाते. तसेच मेहंदीमुळे वर-वधू दोघांना मानसिक शांती मिळते. मेंहदीचा रंग जितका गडद असतो तितके वधूला तिच्या पतीकडून जितके प्रेम मिळते. तसेच तिचे वैवाहिक जीवन यशस्वी होते, असेही त्यांनी सांगितले.
हळदीचे फायदे -
आयुर्वेदानुसार, हळद एक अँटिबयोटिक आणि जंतुनाशक आहे. प्राचीन काळात कॉस्मेटिक उत्पादने नव्हती तेव्हा हळदीचा वापर सौंदर्य वाढविण्यासाठी केला जात असे. हळद केवळ संसर्गापासून वाचवत नाही तर वधू आणि वरांच्या त्वचेचे सौंदर्यही वाढवते. आधुनिक काळात लोक फेस पॅक आणि स्क्रब वापरतात. मात्र, हळदीची परंपरा अजूनही कायम आहे.
advertisement
पिवळ्या रंगाचे धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय महत्त्व -
याबाबत ते म्हणाले की, हळदीचा पिवळा रंग धार्मिक दृष्टीकोनातून खूप शुभ मानला जातो आणि लग्नासारख्या शुभ कार्यात वापरला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, पिवळा रंग गुरू ग्रहाचे प्रतीक आहे आणि हळद लावल्याने वधू-वरांना या ग्रहाचा आशीर्वाद मिळतो. तसेच हा आशीर्वाद सुखी वैवाहिक जीवनासाठी अनुकूल मानला जातो.
advertisement
त्वचेच्या देखभालीत हळदीचे महत्त्व -
त्वचा विशेषज्ञ डॉ. मैत्रीबेन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजकाल वाढते प्रदूषण आणि इतर कारणांमुळे त्वचेवर विपरीत परिणाम होत आहे. त्वचेच्या समस्या टाळण्यासाठी हळद हा नैसर्गिक आणि फायदेशीर उपाय आहे. यामुळे वधू-वरांची त्वचा सुंदर बनते. तसेच त्यांना खाज, डाग यांसारख्या समस्यांपासून देखील आराम देते.
सूचना : ही माहिती राशिचक्र, धर्म आणि शास्त्राच्या आधारे ज्योतिषी आणि आचार्यांशी केलेल्या संवादावर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. कोणताही वैयक्तिक सल्ला नाही. याबाबत लोकल-18 कोणताही दावा करत नाही.
Location :
Gujarat
First Published :
November 12, 2024 5:12 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
वर-वधूला लग्नात हळदी अन् मेहंदी का लावली जाते, अनेकांना माहिती नसेल यामागचं कारण