30 मार्च रोजी घडलेली ही घटना. नारेगावातील व्यावसायिक दयानंद मोरे हे मित्र, आईसह घरी होते. दयानंद यांच्या आईचं ओळखीचे रामचंद्र चव्हाण हे सकाळी त्यांच्या घरी आले. चव्हाण यांच्यासोबत अनोळखी 6 ते 9 जण होते. त्यापैकी 3 महिला होत्या. चव्हाण यांनी ते सर्व पुणे सीआयडीचे कर्मचारी असल्याची बतावणी केली. त्यांच्याकडे सीआयडीचं ओळखपत्रदेखील होतं.
advertisement
कुटुंबालाही सोबत नेलं, अर्ध्या रस्त्यात सोडलं
कुटुंबाच्या घराची झाडाझडती घेऊन 7 लाख रोख आणि 10 तोळे सोन्याचे दागिने घेऊन कुटुंबालाही त्यांच्या वाहनात बसवलं. नगर रोडवर पांढरीच्या पुलापर्यंत त्यांना नेलं आणि पुलाजवळ सोडून दिलं. 26 जून रोजी याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तोतया पोलिसांनी लुटलं, चोरीची पद्धत पाहून खरे पोलीसही चक्रावले
मुंबई-नाशिक महामार्गावर घडलेली ही धक्कादायक घटना. तोतया पोलिसांच्या टोळक्यानं कुरीअरच्या गाडीतून तब्बल 5 कोटी 40 लाख रुपयांचा बॉक्स लांबवल्याचं समोर आलं. या प्रकारानं खळबळ उडाली.
15 मार्च रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कुरियरच्या गाडीला तोतया पोलिसांनी अडवलं. त्यानंतर आम्ही पोलीस आहोत गाडीची पूर्ण तपासणी करायची आहे असे सांगून त्यांनी ही गाडी मुंबई - नाशिक महामार्गावर असलेल्या बॉम्बे ढाब्याच्या बाजूला एका बंद पडलेल्या गोडाऊन जवळ आणली. त्यानंतर या गाडीमध्ये एका बॉक्समध्ये 5 कोटी 40 लाखांची रक्कम होती. ते पार्सल तोतया पोलिसांनी काढून घेतलं आणि गाडी सोडून दिली.
दरम्यान त्यानंतर ज्या व्यक्तीचे हे पैसे होते, त्या व्यक्तीकडे ही गाडी पोहोचली. मात्र गाडीत पैशांचा बॉक्स मिळत नसल्यामुळे त्याला धक्काच बसलाच. त्यानंतर त्याने समोरील पार्टीला कॉल केला असताना त्याने कुरीअर गाडी चालकाला जाब विचारल्यावर त्याने शहापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मुंबई नाशिक महामार्गावर बॉम्बे ढाब्याजवळ घडलेला सर्व प्रकार सांगितला.
कुरीअरच्या गाडी चालकानं सांगितलं की, शहापूर पोलीसंनी बॉम्बे ढाब्याजवळ माझी गाडी चेक केली आणि आमचे पार्सल आहे असे सांगून गाडी मधील एक बॉक्स काढून घेतला. त्यानंतर संबंधित व्यक्तीने याबाबत शहापूर पोलिसांकडे चौकशी केली. या चौकशीत हे पैसे तोतया पोलिसांनी लुटल्याचं समोर आलं आहे. यावरून शहापूर पोलीस ठाण्यामध्ये पाच कोटी, चाळीस लाखांची चोरी झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
