TRENDING:

यांचा गेमच करून टाका..., चहा पिताना चुकून धक्का लागला, छ. संभाजीनगरात तुफान राडा, 17 जण थेट रुग्णालयात

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar: परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिक जमा झाल्याने हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर : सिडकोतील कॅनॉट प्लेस परिसरात रविवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या तरुणांच्या दोन गटांत प्रचंड हाणामारी झाली. सुरुवातीला किरकोळ वादातून सुरू झालेला प्रकार थेट चाकू आणि लाकडी दांड्यांपर्यंत पोहोचला. या घटनेत दोन्ही गटांतील एकूण 17 तरुण जखमी झाले असून, त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. गंभीर जखमींवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी (26 जानेवारी) रात्री 9 वाजता ही घटना घडली. या प्रकरणी सिडको पोलिसांनी दोन्ही गटांतील 17 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
यांचा गेमच करून टाका..., कॉलेज तरुणांत तुफान राडा, 17 जखमी, छ. संभाजीनगरात काय घडलं?
यांचा गेमच करून टाका..., कॉलेज तरुणांत तुफान राडा, 17 जखमी, छ. संभाजीनगरात काय घडलं?
advertisement

या घटनेत जखमी झालेल्या विशाल येशू खेत्रे (वय 24, रा. एन-7 अयोध्यानगर) याचा जबाब पोलिसांनी घाटी रुग्णालयात नोंदवला. त्याच्या तक्रारीनुसार, तो बी.ए.च्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असून, रविवारी तो आपल्या मित्र उत्कर्ष सोपारकर याच्यासोबत कॅनॉट प्लेस येथील गवारे चहा येथे गेला होता. त्या ठिकाणी चुकून त्याचा धक्का एका तरुणाला लागला. यानंतर त्या तरुणासह त्याचा साथीदार शिवीगाळ करू लागल्याने वादाला तोंड फुटले. पुढे धक्का लागलेल्या तरुणाचे नाव शैलेश घुगे असे समोर आले.

advertisement

देवा, हे काय झालं? ‘लक्ष्मी’ घरात आली अन् ‘माऊली’ निघून गेली, छ. संभाजीनगर हळहळलं!

शैलेशसोबत त्याचा मित्र पवन होता. विशालने चूक मान्य करत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असताना, पवनने अचानक चाकू काढत “तुला संपवून टाकतो” अशी धमकी दिली. त्याने विशालच्या मानेवर चाकू खुपसण्याचा प्रयत्न केला. मात्र, विशालने हात पुढे करून वार चुकवला, त्यामुळे चाकूचा वार हातावर लागला. त्यानंतर पवन व शैलेश यांनी आपल्या आणखी तीन ते चार साथीदारांना घटनास्थळी बोलावून घेतले. या सर्वांनी मिळून विशालवर लाकडी दांड्याने बेदम मारहाण सुरू केली.

advertisement

View More

या हल्ल्यात पवनने विशालच्या उजव्या खांद्यावर चाकूने वार केला, तर शैलेशने त्याच्या डाव्या डोळ्याखाली, कपाळावर आणि छातीच्या वरच्या भागावर चाकूचे वार केले. इतर चार जणांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिक जमा झाल्याने हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला.

दरम्यान, या हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या पवन दिगंबर गिते (वय 20, रा. जयभवानीनगर, लोकशाही कॉलनी, एन-4, मुकुंदवाडी) याचाही जबाब पोलिसांनी घाटी रुग्णालयात नोंदवला आहे. त्याने आपल्या तक्रारीत सांगितले की, तो सध्या शिक्षण घेत असून त्याचा भाऊ जेसीबी ऑपरेटर आहे. रविवारी तो गवारे चहा, कॅनॉट प्लेस येथे चहा पिण्यासाठी गेला असता, तेथे त्याचा दूरचा नातेवाइक शैलेश घुगे, त्याचे मित्र तसेच विशाल खेत्रे, त्याचा मित्र उत्कर्ष सोपारकर आणि इतर आठ ते दहा अनोळखी तरुण यांच्यात वाद सुरू होता.

advertisement

पवनच्या म्हणण्यानुसार, त्यावेळी विशाल खेत्रे हा चाकू हातात घेऊन शैलेशवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता, तर उत्कर्षच्या हातात लाकडी दांडा होता. वाद मिटवण्यासाठी पवन मध्ये पडला असता, विशाल, उत्कर्ष आणि त्यांच्यासोबतचे सहा ते सात तरुण पवन व शैलेश यांच्या मागे धावले. “यांना पकडा, यांचा गेमच करून टाका. मी आताच बाहेर आलो असून, पुन्हा काही दिवस आत जाऊन येतो,” असे शब्द विशाल बोलत असल्याचे पवनने तक्रारीत नमूद केले आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रोज खजूर खाण्याचे फायदे, पण प्रमाण काय असावं? इथं चुकाल तर आरोग्याला मुकाल! Vide
सर्व पहा

या दरम्यान उत्कर्षने पवनच्या डाव्या डोळ्याजवळ लाकडी दांड्याने मारले. त्यानंतर पवन व शैलेश पळत मराठा हॉटेलच्या पुढील रस्त्याच्या दिशेने जात असताना, विशालने पवनच्या पाठीवर चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासोबत असलेल्या गौरव वानखेडे या तरुणानेही स्वतःला मोठा गुन्हेगार असल्याचे सांगत पवनच्या कपाळावर व उजव्या खांद्यावर मारून जखमी केले. लोकांची गर्दी वाढताच सर्व आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या संपूर्ण घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक योगेश गायकवाड करत आहेत.

मराठी बातम्या/क्राइम/
यांचा गेमच करून टाका..., चहा पिताना चुकून धक्का लागला, छ. संभाजीनगरात तुफान राडा, 17 जण थेट रुग्णालयात
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल