समोर आलेल्या माहितीनुसार, संबंधित कुटुंबाने रविवारी रात्री चिकन बनवले होते. कुटुंबातील सहा जणांपैकी पाच जणांनी ते जेवण केले. जेवण केल्यानंतर काही वेळातच सर्वांची प्रकृती बिघडली. उलट्या, जुलाब आणि डोके गरगरणे यांसारखी लक्षणे दिसताच कुटुंबीयांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना विषबाधेची लक्षणे असल्याचे सांगत उपचार सुरू केले. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय सूत्रांनी कळवले.
advertisement
सहापैकी पाच जणांना विषबाधा
भाईंदर येथील रमेश मोर्या यांच्या कुटुंबातील नीलम मोर्या आणि राजकुमार मोर्या यांच्यावर मीरा भाईंदर मधील पंडीत भीमसेन जोशी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर चाहत मोर्या आणि अनामिका मोर्या यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे जे.जे. रुग्णालय, मुंबई येथे हलवण्यात आले आहे. रमेश मौर्या याला विषबाधा झाली नसून तो ताडीच्या नशेत असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
विषबाधेचे नेमके कारण अस्पष्ट
घरात पोलिसांना शिळा भात, वडा पाव, खराब अवस्थेत मिळून आले आहेत. विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट न झाल्यामुळे पोलिसांनी प्रकरण संशयास्पद मानून फॉरेन्सिक टीमला पाचारण केले आहे. या संपूर्ण घटनेचा तपास मीरा भाईंदर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कांबळे करत आहेत.
कुटुंबीयांवर वैद्यकीय उपचार सुरू
या प्रकरणाकडे पोलिस तपास करत असून या प्रकारचा गुन्हेगारी हेतू आहे का, हे तपासले जात आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या कुटुंबीयांवर वैद्यकीय उपचार सुरू असून सर्वजण आता धोक्याबाहेर आहेत. मात्र, या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल येईपर्यंत अन्नातून विषबाधा की षडयंत्र, याचा अंदाज लावणे योग्य ठरणार नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
हे ही वाचा :
घरात झोपली होती तरुणी, बापाने झोपेतच घोटला गळा मग..., महाराष्ट्राला हादरवणारी घटना!