दोघांनी मिळून केली पतीची हत्या
24 जून रोजी तिप्तूर तालुक्यातील कडाशेट्टीहल्ली गावात ही घटना घडली. शंकरमूर्ती (50) नावाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांची पत्नी सुमंगला तिप्तूर येथील एका मुलींच्या वसतिगृहात स्वयंपाकीण म्हणून काम करत होती. सुमंगला आणि तिच्या प्रियकराच्या प्रेमसंबंधांना शंकरमूर्तीने आक्षेप घेतल्याने, सुमंगला आणि तिच्या प्रियकराने मिळून त्याची हत्या केली.
advertisement
डोळ्यात मिरचीपूड टाकली, पुढे...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एनडीटीव्हीने म्हटले आहे की, सुमंगलाने शंकरमूर्तीच्या डोळ्यात मिरची पूड फेकली आणि त्याला काठीने मारले. पोलिसांनी सांगितले की, सुमंगलाने त्याच्या गळ्यावर पायही ठेवला होता. शंकरमूर्तीचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यावर, तिचा प्रियकर नागराजु आणि सुमंगलाने शंकरमूर्तीचा मृतदेह एका पोत्यात बांधून, 30 किलोमीटर दूर असलेल्या तुरुवेक्करे तालुक्यातील एका शेतातील विहिरीत फेकून दिला.
पत्नीने दिली हत्येची कबुली
शंकरमूर्ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर या धक्कादायक खुनाचा उलगडा झाला. नोणाविणकेरे पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना शंकरमूर्तीच्या शेतातून मिरची पूडचे अंश सापडले. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, पोलिसांना पलंगावरही मारामारीची चिन्हे आढळली. यानंतर पोलिसांनी सुमंगलाची चौकशी केली. त्यांच्या कॉल डिटेल्सचीही तपासणी करण्यात आली. चौकशीनंतर सुमंगलाने गुन्ह्याची कबुली दिली. नोणाविणकेरे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुनाच्या पुढील तपास सुरू आहे.
हे ही वाचा : गळा दाबला, जमिनीवर डोकं आपटलं, जन्मदातीला हालहाल करून मारलं, कारण वाचून बसेल धक्का
हे ही वाचा : इन्स्टावर ओळख अन् लग्नाचा हट्ट, वर्ध्यात नर्सवर कटरने वार, हल्ल्याचं कारण समोर