तरुणाची आत्महत्या
नवी मुंबईतील उलवे परिसरात राहणाऱ्या 28 वर्षीय तरुणाने अचानक आत्महत्या केली होती. जानेवारीत हा प्रकार घडला. मात्र, आत्महत्येचं नेमकं कारण पुढं आलं नव्हतं. सदर घटनेची चौकशी पोलीस करत होते. मात्र, कारण स्पष्ट होत नव्हते. अखेर पोलिसांना तपासात यश आले आणि चौकशीतून प्रेमसंबंधातून आत्महत्या झाल्याचे समोर आले.
Online Game: इन्स्टाग्रामवर मिळाली लिंक, पैसे डबल करायला गेला, तरुणाचा 40 लाखांचा ऑनलाईन गेम!
advertisement
मावस भाऊ-बहिणीचे प्रेमसंबंध
मावस भाऊ आणि बहिणीचा एकमेकांवर जीव जडला होता. काही दिवस प्रेमसंबंधात राहिल्यानंतर दोघांनी रजिस्टर लग्नाचा निर्णय घेतला. या घटनेची कुटुंबीयांना कोणतीही माहिती नव्हती. काही दिवसांनी तरुणीला बदनामीची भीती वाटू लागली. त्यामुळे दोघांमध्ये वाद सुरू झाले आणि दोघांत बेबनाव होत होता.
तरुणीने केले दुसरे लग्न
बदनामीच्या भीतीतून दोघांत वाद होत होते. अशातच तरुणीने दुसऱ्या एका तरुणासोबत रजिस्टर लग्न केले. ही बाब संबंधित तरुणाला समजली. त्यामुळे तो मानसिक तणावात होता. या तणावतच त्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येनंतर पोलिसांनी मित्र परिवाराकडे चौकशी केली. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.
तरुणीवर गुन्हा
तरुणाने प्रेमसंबंधांतून आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. त्यानंतर संबंधित तरुणीवर उलवे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.






