सायबर चोरट्यांना असा मारला डल्ला
समोर आलेली माहिती अशी की, तक्रारदार संजय श्रीरंग धुमाळ (वय-45, रा. गोडोली, सातारा) हे जावलीचे गटशिक्षणाधिकारी आहेत. त्यांना 7 मे 2025 रोजी व्हाॅट्सअपवर एक मेसेज आला. तो मेसेज बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या नावाने होते. तो मेसेज ओपन केल्यानंतर एपीके फाईल दिसली, ती त्यांनी ओपन केली. त्यात 16 अंकांचा त्यांचा एटीएम नंबर मागण्यात आला. तो त्यांनी दिला.
advertisement
टप्प्याने काढून घेतली रक्कम
त्यानंतर पुन्हा 13 मे 2025 रोजी असाच एक मेसेज आला. त्यांनी तो ओपन केला, पुन्हा एपीके फाईल ओपन करून एटीएम नंबर दिला. यानंतर मात्र त्यांच्या बँक खात्यातून एक लाख, दीड लाख... अशी टप्प्याने रक्कम काढून घेण्यात आली. अशाप्रकार 8 लाख 10 हजार 266 रुपये आत्तापर्यंत काढून घेण्यात सायबर चोरटे यशस्वी झाले. शेवटी आपली फसवणूक झालीय, हे लक्षात येताच तक्रारदारांने पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिसांकडे तक्रार केली.
हे ही वाचा : 'तो' रोज बस प्रवासात देतोय त्रास, आईला सांगितला प्रकार, पण.. अल्पवयीन मुलीने संपवलं जीवन!
हे ही वाचा : 'या' लाॅजवर सुरू होतं भलतंच; पोलिसांना मिळाली टीप अन्... खंडाळ्यातून समोर आला 'मोठा कांड'