नेमकं घडलं काय?
तुळजापूर येथील हडको भागात असलेल्या लिटिल फ्लॉवर्स शाळेत संजय पवार हे मुख्याध्यापक आहेत. मंगळवारी ते नेहमीप्रमाणे सकाळी शाळेत गेले. यानंतर त्यांच्या गवते प्लॉटिंग येथील घरी पत्नी रत्नमाला पवार आणि विवाहित मुलगी प्रतीक्षा पाटील यांनी एकाच दोरीला गळफास घेतला. हा प्रकार दुपारी उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला. रात्री 9.30 वाजता शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. प्रतीक्षा पाटील (वय 23) हिचा सोलापूर जिल्ह्यातील सापटणे येथील एका शेतकरी तरुणाशी वर्षभरापूर्वीच विवाह झाला होता.
advertisement
बीडमध्ये चाललंय काय? खंडणी प्रकरणानंतर सायबर दरोडे, शिक्षक अन् पोलिसही अडकले
मृतदेहाजवळ आढळली चिठ्ठी
घटनास्थळी पोलिसांना एक चिठ्ठी आढळून आली. त्यामध्ये प्रतीक्षा पाटील हिला पुढील शिक्षण घ्यायचे होते. मात्र, शिक्षण बंद करून तिचा विवाह शेतकरी मुलासोबत लावून देण्यात आल्याची खंत व्यक्त करण्यात आलीये. पोलिसांनी ही चिठ्ठी ताब्यात घेतली असून अधिक तपास सुरू आहे.
शेजाऱ्यांकडे दिली घराची चावी
रत्नमाला पवार आणि प्रतीक्षा पाटील यांनी आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या घराचा दरवाजा बंद न करता तो पुढे लोटला आणि दुसऱ्या गेटला कुलूप लावले. घराची चावी शेजाऱ्यांकडे दिली आणि त्यांना बाहेर जात असल्याचे सांगितले. त्यानंतर फक्त पुढे केलेल्या दुसऱ्या दरवाजाने त्यांनी घरात प्रवेश केला आणि एकाच दोरीने माय-लेकीने गळफास घेतला.
दरम्यान, मृत मुलीची शिक्षण घेण्याची इच्छा होती. मात्र, इच्छेविरुद्ध तिचा शेतकरी मुलाशी विवाह केल्याने ती नैराश्यात होती. त्यामुळेच माय-लेकींनी टोकाचे पाऊल उचलले. या घटनेने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होतेय.