धुळे जिल्ह्यातील थाळनेर गावात ही घटना घडली आहे. या गावात संजय कोळी यांचे कुटुंब राहते. संजय कोळी यांचे लग्न झालेले असून, त्यांना या लग्नापासून दोन लहान मुले आहे. असा त्याचा हा छोटासा परीवार होता. दरम्यान घटनेच्या दिवशी संजय कोळी यांचा कोणत्या तरी कारणावरून बायकोशी वाद झाला. हा वाद पुढे जाऊन इतका विकोपाला गेला की संजय कोळी याने त्याच्या काळजाचा तुकडा असलेल्या दोन चिमुकल्यांना तापी नदी पात्रात फेकून त्यांचा जीव घेतला आहे. या घटनेनंतर संजय कोळी हा घटनास्थळावरून फरार झाला आहे.
advertisement
दरम्यान स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना देताच त्यांनी घटनास्थळ गाठून तपास सूरू केला होता. तापी नदी पात्रात फेकून दिलेल्या त्या दोन बहिण भावाचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.तसेच हे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. तसेच बायको सोबत झालेल्या वादातून बापानेच मुलांची हत्या केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले होते.
या आरोपी जन्मदाता संजय कोळी हा फरार झाला आहे. पोलिसांनी संजय कोळीवर थाळनेर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.तसेच या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
तरूणीची कोठडीत आत्महत्या
धुळे जिल्ह्यातील कारागृहात एका न्यायाधीन महिला बंदीवानाने गळफास घेऊन जीवन संपवलं आहे. चंद्रमा बैरागी असं या 20 वर्षांच्या तरुणीचं नाव आहे. महिला सेलला लागून असलेल्या बाथरूमजवळ तरुणीने गळफास लावून घेतला, ज्यात तिचा मृत्यू झाला आहे. दोन दिवसांपूर्वीच या महिलेला एका गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळाल्याने तिला कारागृहात आणण्यात आलं होतं.
तरुणीने कारागृहातच गळफास लावून घेतल्याने तिचे नातेवाईक चांगलेच आक्रमक झाले आहेत. कारागृहात पोलीस संरक्षण असताना संबंधित तरुणीने गळफास कसा लावून घेतला? असा जाब तरुणीच्या नातेवाईकांनी विचारला आहे. तसंच नातेवाईकांनी तरुणीचा मृतदेह कारागृहाच्या बाहेर न्यायलाही विरोध केला आहे.