TRENDING:

'तू लय माजलास, तुला...', बीडमध्ये मुंडे अन् गिते गँगकडून शेतकऱ्याला बेल्टने अमानुष मारहाण

Last Updated:

Crime in Beed: घरासमोर दुचाकीचा हॉर्न का वाजवतो? असे विचारल्याच्या कारणावरून एका शेतकऱ्याचे अपहरण करून बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सुरेश जाधव, प्रतिनिधी बीड: घरासमोर दुचाकीचा हॉर्न का वाजवतो? असे विचारल्याच्या कारणावरून एका शेतकऱ्याचे अपहरण करून बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी बेल्टने मारहाण केली. आरोपींनी बुक्क्यांनी तोंडवर, नाकावर देखील मारहाण केली. हा प्रकार जुलै २०२४ मध्ये घडला होता. या मारहाणीचा व्हिडीओ बनवून व्हायरल केला होता. आता नऊ महिन्यानंतर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
News18
News18
advertisement

सचिन मुंडे, आदित्य गित्ते, सुमित उर्फ बबलू बालाजी गित्ते अशी आरोपींची नावे आहेत. सचिन मुंडे, आदित्य गित्ते यांनी परळीत अलीकडेच शिवराज दिवटे याला अमानुष मारहाण केली होती. त्या आरोपीच्या अटकेनंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता याही प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याने मुंडे आणि गित्ते टोळीचे पाय आणखी खोलात गेलाच दिसत आहे.

advertisement

परळी तालुक्यातील नंदा गौळ गावातील योगीराज अशोक गित्ते (वय ३२) या शेतकऱ्याने नऊ महिन्यानंतर फिर्याद दिली आहे. आदित्य आणि सचिन हे अनेकदा घरासमोरुन दुचाकीवरून ये-जा करताना हॉर्न वाजवायचे. एकेदिवशी त्यांची गाडी थांबवून योगीराज यांनी 'तुम्ही असे का करता?' असा जाब विचारला. यावर आरोपींनी 'हा रस्ता तुझ्या बापाचा आहे का? आम्ही काही पण करु. तू आमच्या नादी लागू नको, नाहीतर तुझ्याकडे बघावे लागेल', अशी धमकी दिली.

advertisement

यानंतर २५ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता योगीराज नंदागौळ ते घाटनांदुर रस्त्याने आपल्या घरी येत होते. दरम्यान ते रस्त्यावरील पाण्याच्या टाकीजवळ आले असता आदित्य गित्ते आणि सचिन विष्णू मुंडे हे दुचाकीवरून आले. त्यांनी योगीराज यांना अडवून त्यांची कॉलर पकडली. त्यांना जबरदस्तीने दुचाकीवर बसवून विठ्ठल टेकडी परिसरात नेले. इथे सुमित नावाचा आरोपी आधीपासून उभा होता.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्याने केली 300 झाडांची लागवड, एकरात मिळाला 5 लाखांचा नफा, असं काय केलं?
सर्व पहा

टेकडीवर नेल्यानंतर आरोपी सचिन मुंडे आणि आदित्य गित्ते यांनी 'तू लय माजलास का? रस्त्यात थांबून दुचाकीवर रेस का करतो, असं म्हणत दोघांनी शिवीगाळ केली. यावेळी आरोपी सचिन मुंडे याने बेल्टने पाठीवर, तोंडावर, पायावर आणि हातावर मारहाण करून जखमी केले. पुन्हा जर आमच्या नादी लागला तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत आरोपी योगीराज यांना तिथेच सोडून निघून गेले. तक्रार दिली तर ते पुन्हा मारतील, या भीतीने योगीराज यांनी तक्रार दिली नसल्याचं सांगण्यात येतंय. आता अखेर नऊ महिन्यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
'तू लय माजलास, तुला...', बीडमध्ये मुंडे अन् गिते गँगकडून शेतकऱ्याला बेल्टने अमानुष मारहाण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल