TRENDING:

मोबाईलवर लेकीला नको ते व्हिडीओ दाखवून बापानेच तोडले लचके, जालन्याची संतापजनक घटना

Last Updated:

जालना शहरातून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नराधम बापाने स्वतः च्या जन्मदात्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला असल्याची तक्रार पीडित मुलगी आणि तिच्या आईने चंदनशिरा पोलीस स्थानकात केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जालना : जालना शहरातून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील नवीन मोंढा परिसरात राहणाऱ्या एका नराधम बापाने स्वतः च्या जन्मदात्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला असल्याची तक्रार पीडित मुलगी आणि तिच्या आईने चंदनशिरा पोलीस स्थानकात केली आहे. पिडीतेने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच घटनेची गांभीर्यता लक्षात घेऊन आरोपी पित्याला पोलिसांनी तत्काळ बेड्या ठोकल्या आहेत.
News18
News18
advertisement

याबाबत अधिक माहिती अशी की, नवीन मोंढा परिसरातील हनुमाननगर येथे राहणाऱ्या नराधम आरोपीने स्वतःच्या अल्पवयीन मुलीला स्वतःच्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ दाखवून लैंगिक अत्याचार केला. तसेच घटनेची वाच्यता केल्यास गळा दाबून जीवे मारण्याची धमकी दिली.

मुंबई, पुण्यात उकाडा वाढला, पारा पोहोचला इतक्यावर, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?

याबाबत पीडित मुलीने आपल्या आईला सांगितल्यानंतर पीडिता आणि तिची आई दोघींनी पोलीस स्थानक चंदनझिरा जालना येथे केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपी नराधम बापाविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि पोकसो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपीला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश मिळालं आहे.

advertisement

View More

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
महाशिवरात्रीला शंकराच्या पिंडीवर चुकूनही अशा वस्तू टाकू नका, संपूर्ण माहिती, Vid
सर्व पहा

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधिक्षक अयुष नोपाणी, उप विभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मागदर्शनाखाली प्रो.डि.वाय.एस.पी. करिश्मा चौधरी, व सदर बाजार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप भारती, महिला सपोनि गायकवाड, चंदनझिरा जालनाचे पोलीस उप निरीक्षक विठ्ठल शिंदे, अफसर हुशेन, अशोक जाधव कृष्णा तंगे, साई पवार, अभिजीत वायकोस, नवनाथ पाटील, चालक बोटवे यांनी केली आहे.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
मोबाईलवर लेकीला नको ते व्हिडीओ दाखवून बापानेच तोडले लचके, जालन्याची संतापजनक घटना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल