TRENDING:

नाशिक हादरलं! पत्नीबद्दल मित्राचा तो शब्द, त्याचं डोकं फिरलं, कायमचं संपवलं

Last Updated:

Nashik News: पत्नी काजलने बहिणीला फोन करून घडलेला प्रकार सांगितला आणि "माझा पती रागाच्या भरात काहीतरी टोकाचे पाऊल उचलणार आहे, तुम्ही लवकर घरी चला," असा इशारा दिला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिक: मित्राच्या पत्नीबद्दल वापरलेले चुकीचे शब्द आणि मनात ठेवलेल्या वाईट भावनेचा राग एकाच्या जीवावर बेतला. इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे येथील पिंपळगाव डुकरा येथे शुक्रवारी (दि. 20) रात्री मित्रानेच मित्राचा दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनिल एकनाथ गिन्हे (रा. गिन्हेवाडी) असे मृताचे नाव असून, अवघ्या दोन तासांत पोलिसांनी संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
नाशिक हादरलं! पत्नीबद्दल मित्राचा तो शब्द, त्याचं डोकं फिरलं, कायमचं संपवलं
नाशिक हादरलं! पत्नीबद्दल मित्राचा तो शब्द, त्याचं डोकं फिरलं, कायमचं संपवलं
advertisement

काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, अजय रंगनाथ पवार आणि त्याची पत्नी काजल हे बहीण मंगल वाळू मधे यांच्याकडे पिंपळगाव डुकरा येथे आले होते. दरम्यान, गुरुवारी रात्री अजय पवार आणि अनिल गिन्हे हे दोघे एकत्र असताना अनिलने अजयच्या पत्नीबद्दल अपशब्द वापरल्याचे तसेच त्याच्या मनात वाईट भावना असल्याचे काजलच्या निदर्शनास आले.

Pune News: लग्नासाठी नवरा शोधायला गेली अन् हाताला लागला भामटा, पुण्याची 44 वर्षीय महिला कशी फसली?

advertisement

View More

यावरून अजयचा पारा चढला. पत्नी काजलने बहिणीला फोन करून घडलेला प्रकार सांगितला आणि "माझा पती रागाच्या भरात काहीतरी टोकाचे पाऊल उचलणार आहे, तुम्ही लवकर घरी चला," असा इशारा दिला. दोघींनी तातडीने धाव घेतली, मात्र तोपर्यंत अजयने अनिलचा दगडाने ठेचून खून केला होता. अनिल रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहून सगळेच हादरले.

दोन तासांत आरोपी गजाआड

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Tata आता करणार मार्केट जाम, आणली 468 किमी मायलेजदार SUV; किंमतही 6 लाखांपासून
सर्व पहा

घटनेची माहिती मिळताच वाडीवऱ्हे पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हालवली. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पांडुरंग जाधव आणि त्यांच्या पथकाने परिसरात शोधमोहीम राबवून संशयित अजय रंगनाथ पवार याला अवघ्या दोन तासांत अटक केली. गुन्ह्यातील आरोपीला तात्काळ जेरबंद केल्यामुळे पोलीस दलाचे कौतुक होत आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
नाशिक हादरलं! पत्नीबद्दल मित्राचा तो शब्द, त्याचं डोकं फिरलं, कायमचं संपवलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल