सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याची 27 वर्षीय शिवानी ही गोव्याच्या ट्रिपवर गेली होती. या ट्रिपवर असताना तिने पॅराग्लायडिंग करण्याचा निर्णय घेतला होता. ही पॅराग्लायडिंग करताना शिवानीचा आणि पॅराग्लायडिंग पायलटचा मृत्यू झाला आहे. 18 जानेवारीला ही घटना क्री पठार,केरी, परनेम येथे घडली आहे.
खरं तर परवानगीशिवाय आणि योग्य सुरक्षा उपकरणांशिवाय पॅराग्लायडिंग केले जात होते. त्यामुळे हा अपघात घडल्याची माहिती आहे. पॅराशूटने डोंगरावरून उड्डाण केल्यानंतर ते आकाशात उडण्यापेक्षा थेट खाली कोसळलं होतं. त्यामुळे शिवानी आणि नेपाळी पायलट सुमन नेपाळी यांचा उंचीवरून कोसळून मृत्यू झाला होता.
advertisement
कंपनी आणि तिच्या मालकाविरूद्ध मनुष्यवधाचा गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींवर परवानगीशिवाय आणि योग्य सुरक्षा उपकरणांची व्यवस्था न करता पर्यंटकाला पॅराग्लायडिंग नेल्याचा आरोप आहे. कंपनीच्या हलगर्जीपणामुळेच दोघांचा उंचीवरून पडून मृत्यू झाला आहे, अशी माहिती गोव्याचे पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी दिली.
दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी पॅराग्लायडींग कंपनीचा मालक शेखर रायजादा याला अटक करून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.