पैशांसाठी आजीचा जीव घेतला
अंजनबाई ओंकार सुरळकर असे मृत वृद्ध महिलेचे नाव आहे, तर आरोपी नातू प्रवीण शांताराम सुरळकर याच्यावर बोराखेडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीणला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्याला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मृत अंजनबाई यांच्याकडे वडिलोपार्जित 2 एकर आणि शासनाकडून मिळालेली 6 एकर अशी एकूण 8 एकर शेती होती. तसेच, त्यांना पेन्शनही मिळत असे. प्रवीण सुरळकर हा अनेक दिवसांपासून अंजनबाई यांच्याकडे 6 एकर जमीन आणि अर्धी पेन्शन नावावर करून देण्यासाठी तगादा लावत होता. मात्र, अंजनबाई प्रत्येक वेळी नकार देत असत. यामुळे प्रवीणने त्यांच्यासोबत वाद घालून त्यांना धमक्याही दिल्या होत्या.
advertisement
एकट्या पाहून केला खून
5 ऑगस्ट रोजी सकाळी फिर्यादीचा मुलगा कार शिकण्यासाठी मोताळा येथे गेला होता. दिलीप सुरळकर, त्यांची पत्नी आणि लहान मुलगा शेतात गेले होते, त्यामुळे अंजनबाई घरी एकट्या होत्या. दुपारी 12 वाजता फिर्यादीचा मुलगा घरी परतला असता, त्याला आजी मृतावस्थेत आढळल्या. त्यांच्या तोंडातून आणि नाकातून रक्तस्त्राव होत होता, तसेच गळ्यावर गळा दाबल्याचे स्पष्ट व्रण दिसत होते. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रवीण सुरळकर याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे समजते. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.
हे ही वाचा : Kolhapur News: बहिणीने 'अपशब्द' वापरला, भाऊ जिवानिशी गेला; लिफ्ट मागितली अन् मागून केले सपासप वार!
हे ही वाचा : 'आईला का त्रास देतोस?' म्हणत धाकट्यानेच संपवले मोठ्या भावाला; हत्येसाठी घेतली मित्राची मदत!