'आईला का त्रास देतोस?' म्हणत धाकट्यानेच संपवले मोठ्या भावाला; हत्येसाठी घेतली मित्राची मदत! 

Last Updated:

तुमसर शहरातील आंबाटोली परिसरात घरगुती वादातून लहान भावाने मोठ्या भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. दारूच्या नशेत असताना राकेश वासनिक याने...

Crime News
Crime News
तुमसर (भंडारा) : घरगुती वादातून आईला का त्रास देतो, म्हणते लहान भावाने मित्राच्या मदतीने मोठ्या भावाची हत्या केली. ही धक्कादायक घटना शहरातील आंबाटोली परिसरात घडली. रोशन प्रकाश वासनिक (वय-35,  रा. आंबाटोली, आंबेडकर वाॅर्ड, तुमसर) असे मृत व्यक्तीचं नाव आहे. याप्रकरणी लहान भाऊ राकेश प्रकाश (वय-32, रा. आंबाटोली, आंबेडकर वाॅर्ड, तुमसर) आणि त्याचा मित्र किरण उर्फ लारा मारबते (वय-28, रा. कुंभारे वाॅर्ड, तुमसर) असे अटक केलेल्या आरोपींनी नावे आहेत.
दारूच्या नशेत वाद विकोपाला
ही घटना दोन दिवसांपूर्वी मंगळवारी, 5 ऑगस्ट रोजी घडली. मृत रोशन, त्याचा धाकटा भाऊ राकेश आणि त्याचा मित्र किरण उर्फ लारा हे दारू पिण्यासाठी एकत्र बसले होते. दारू पिल्यानंतर राकेशने मोठा भाऊ रोशन याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. ‘तू आपल्या आईशी का भांडतोस?’ या प्रश्नावरून त्यांच्यात वाद इतका वाढला की, राकेश आणि त्याचा मित्र किरण यांनी रोशनला पकडून बेदम मारहाण केली. त्यांनी रोशनवर विटांनी हल्ला केला. जखमी अवस्थेत रोशन घरी आला आणि बाहेर असलेल्या ओट्यावर झोपला. त्यानंतरही मद्यधुंद अवस्थेत असलेल्या राकेशने त्याच्या पोटावर लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यात गंभीर जखमी झालेल्या रोशनचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
नैसर्गिक मृत्यू असल्याचा बनाव
सुरुवातीला राकेश आणि किरणने रोशनचा मृत्यू दारूच्या नशेत झाल्याचा बनाव केला. पण काही स्थानिकांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी सखोल तपास केला असता ही हत्या असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तात्काळ राकेश वासनिक आणि त्याचा मित्र किरण उर्फ लारा मारबते यांना अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम103 (1) आणि 3 (5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस अधीक्षक मयंक माधव आणि पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
'आईला का त्रास देतोस?' म्हणत धाकट्यानेच संपवले मोठ्या भावाला; हत्येसाठी घेतली मित्राची मदत! 
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement