हात-पाय बांधलेले, कपडे फाटलेले... चिपळूणात निवृत्त शिक्षिकेची निर्घृण हत्या; सीसीटीव्हीचा डीव्हीआर गायब!

Last Updated:

चिपळूणमध्ये एकट्या राहत असलेल्या सेवानिवृत्त शिक्षिका वर्षा जोशी (वय-63) यांचा त्यांच्या राहत्या घरी निर्घृण खून करण्यात आला आहे. हैदराबादला फिरायला जाण्याच्या एक दिवस आधी ही घटना घडली. मैत्रिणीने...

Crime News
Crime News
रत्नागिरी : चिपळूण येथे एका सेवानिवृत्त शिक्षिकेचा राहत्या घरीच निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हत्याकांडामुळे चिपळूणमध्ये एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. वर्षा जोशी (वय-63) असे मृत शिक्षिकेचे नाव आहे. एकट्या राहणाऱ्या या शिक्षिकेचा चोरीच्या उद्देशाने खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मैत्रिणीच्या फोनमुळे उघडकीस आले प्रकरण
वर्षा जोशी या त्यांच्या मैत्रिणींसोबत हैदराबाद येथे फिरायला जाणार होत्या. त्यांची मैत्रीण त्यांना वारंवार फोन करत होती, मात्र त्या फोन उचलत नव्हत्या. त्यामुळे मैत्रीण काळजीत पडली आणि तिने वर्षा यांच्या शेजाऱ्यांना फोन करून चौकशी करण्यास सांगितले. शेजाऱ्यांनी दरवाजा उघडून पाहिले असता, त्यांना घरात वर्षा जोशी यांचा मृतदेह आढळला. त्यांचे हातपाय घट्ट बांधलेले होते. या धक्कादायक प्रकारानंतर तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली.
advertisement
खूनच झाल्याची प्राथमिक शक्यता
  • घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता अनेक गोष्टी समोर आल्या...
  • वर्षा जोशी यांचा मृतदेह बेडरूममध्ये पाय बांधलेल्या अवस्थेत पडलेला होता.
  • मृत्यूपूर्वी त्यांनी प्रतिकार केला असावा, कारण त्यांच्या अंगावरील कपडे फाटलेले होते आणि चेहऱ्यावर काही व्रण दिसत होते.
  • घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर (DVR) गायब करण्यात आला आहे.
  • घराचा मागचा दरवाजा उघडा होता, ज्यामुळे मारेकरी घरात घुसले असावेत.
  • त्यांच्या मृतदेहाजवळ मंगळसूत्र आणि इतर काही दागिने आढळले असले तरी, घरातील इतर किमती वस्तू चोरीला गेल्या आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत.
advertisement
या सर्व परिस्थितीमुळे हा खूनच झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे.
कोण होत्या वर्षा जोशी?
वर्षा जोशी या सेवानिवृत्त शिक्षिका होत्या. त्यांचे पतीचे निधन अकरा वर्षांपूर्वी झाले होते आणि त्यांना कोणतेही आपत्य नव्हते. त्यामुळे त्या घरात एकट्याच राहत असत. काल (गुरुवारी 7 ऑगस्टला) त्या मैत्रिणींसोबत फिरायला जाऊन काही आनंदाचे क्षण घालवणार होत्या, पण त्याआधीच काळाने त्यांच्यावर घाला घातला. पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत असून, खून कोणी आणि कशासाठी केला, याचा तपास करत आहेत.
advertisement
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
हात-पाय बांधलेले, कपडे फाटलेले... चिपळूणात निवृत्त शिक्षिकेची निर्घृण हत्या; सीसीटीव्हीचा डीव्हीआर गायब!
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement