कुटुंबावर क्रूर आघात! मुलाच्या मृत्यूचा धक्का झाला नाही सहन; अवघ्या 5 तासांत आईने घेतला जगाचा निरोप

Last Updated:

तासगाव तालुक्यातील कुमठे गावात एकाच दिवशी माय-लेकाचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. नामवंत पैलवान अविनाश महादेव पाटील (वय-54) यांचे दीर्घ आजाराने...

Sangali News
Sangali News
तासगाव (सांगली) : तासगाव तालुक्यातील कुमठे गावात एका हृदयद्रावक घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दीर्घ आजाराने मुलाचे निधन झाले आणि या मृत्यूचा धक्का सहन न झाल्यामुळे अवघ्या पाच तासांत आईनेही जगाचा निरोप घेतला. मंगळवारी सकाळी घडलेल्या या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
नामवंत पैलवानाचे निधन
अविनाश महादेव पाटील (वय-54) आणि त्यांची आई सुधाताई महादेव पाटील (वय-75) अशी या माय-लेकांची नावे आहेत. कुमठे येथील जिल्हा परिषद शाळेजवळ अविनाश पाटील आपल्या कुटुंबासोबत राहत होते. ते एक नामवंत पैलवान म्हणून ओळखले जात असत. तरुण पिढीने व्यसनांपासून दूर राहून कुस्तीकडे वळावे, यासाठी ते नेहमीच प्रयत्न करत.
गेल्या काही दिवसांपासून अविनाश गंभीर आजाराशी झुंज देत होते. अखेर मंगळवारी पहाटे 5.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली आणि सर्वत्र शोककळा पसरली. नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत सकाळी 7.30 वाजता त्यांच्या पार्थिवावर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
advertisement
मुलाच्या दुःखात आईही गेली
पण नियतीला काहीतरी वेगळेच मंजूर होते. मुलाच्या मृत्यूचा आघात आणि त्याच्या अंत्यसंस्काराचा धक्का आई सुधाताई पाटील यांना सहन झाला नाही. मुलाच्या अंत्यविधीनंतर अवघ्या काही तासांतच, सकाळी 11.30 वाजता त्यांचीही प्राणज्योत मालवली. जे नातेवाईक आणि मित्रपरिवार अविनाशच्या अंत्यसंस्कारासाठी आले होते, ते आपल्या घराकडे परतत असतानाच त्यांना सुगताबाई यांच्या निधनाची बातमी कळाली.
advertisement
अवघ्या पाच तासांच्या अंतराने माय-लेकाचा मृत्यू झाल्याने कुमठे गावात शोककळा पसरली. पाटील कुटुंबीयांवर नियतीने क्रूर सूड उगवल्याची भावना सर्वजण व्यक्त करत आहेत. अविनाश यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई आणि सुना असा मोठा परिवार आहे.
advertisement
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
कुटुंबावर क्रूर आघात! मुलाच्या मृत्यूचा धक्का झाला नाही सहन; अवघ्या 5 तासांत आईने घेतला जगाचा निरोप
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement