विनाकारण काढली भांडणं आणि केला चाकू हल्ला
सविस्तर माहिती अशी की, 26 ऑगस्ट रोजी पहाटे 5.30 वाजता सिडको बसस्थानक परिसरात हातगाड्यावर एक दाम्पत्य खाद्यपदार्थांची विक्री करत होतं. त्याचवेळी अक्षय पाटील आणि त्याचा भाऊ दारूच्या नशेत या परिसरात आले. कारण नसताना दोघांनी खाद्यपदार्थ विकणाऱ्या पती-पत्नीला वाद घालण्यास सुरूवात केली. "नाश्त्याच्या प्लेटमधील कचरा का काढला नाही", म्हणत त्या 22 वर्षीय विवाहित महिलेला अश्लील शिवीगाळ करण्यास सुरूवात केली.
advertisement
साहित्याची केली नासधूर अन् विवाहितेला शिवीगाळ
इतकंच करून हे 2 दारूडे शांत बसले नाहीत. तर त्यांच्याच गाड्यावर चाकू घेतला आणि पतीच्या पोटात खुपसला. या हल्ल्यात पती गंभीर जखमी झाला. पत्नी पतीला सावरत होती, त्याचवेळी या दारूड्यांनी हातगाड्यावरील साहित्याची नासधूस केली आणि दाम्पत्याचा मोबाईलही फोडली. या गंभीर घटनमुळे परिसरातील नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. आरोपी अक्षय पाटील याच्यापूर्वीही 2 गुन्हे दाखल आहेत, असे पोलिसांनी सांगितले.
हे ही वाचा : Nashik News: बैलाने दिली धडक, पुतण्या पडला विहिरीत, वाचविण्यासाठी काकाने मारली उडी, पण...
हे ही वाचा : देव तारी त्याला कोण मारी! मृत्यूच्या दाढेतून 'हे' बाळ तीनदा परतलं; CCTV तपासले आणि पोलिसही चक्रावले
