TRENDING:

"ब्युटी पार्लरला जाऊन येते", असं सांगून घराबाहेर पडली 5 मुलांची आई; पोलीस स्टेशनबाहेर रडतोय पती, पत्नीचा 'तो' मित्र...

Last Updated:

रौशन अन्सारी यांच्या पत्नीने ‘ब्यूटी पार्लर’चा बहाणा करत घर सोडलं आणि परतलीच नाही. दोघं १४ वर्षांपासून विवाहित असून त्यांना तीन मुलं आणि दोन मुली आहेत. रौशन यांच्या मते...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
तुम्ही पती-पत्नी आणि तिसऱ्या व्यक्तीच्या अनेक कथा ऐकल्या आणि पाहिल्या असतील... पण बिहारमधील छपरा जिल्ह्यातून एक असं प्रकरण समोर आलं आहे, ज्यामुळे बिचारा पती अक्षरशः पोलीस स्टेशनचे उंबरे झिजवतोय. छपरा जिल्ह्यातील गौरा गावातून ही एक धक्कादायक प्रेमकहाणी समोर आली आहे. या प्रेमकहाणीत अनपेक्षित वळण आलं, जेव्हा रोशन अन्सारीची पत्नी शहीन खातून ब्यूटी पार्लरला जाण्याचं निमित्त करून कुठेतरी निघून गेली. आता रोशन पोलिसांकडे जाऊन आपल्या पत्नीचा शोध घेण्यासाठी विनवणी करत आहे.
Crime News
Crime News
advertisement

14 वर्षांचा संसार आणि 5 मुलं

रोशनने सांगितलं की, त्यांचं लग्न होऊन 14 वर्षे झाली आहेत आणि त्यांना पाच मुलं आहेत. तीन मुलं आणि दोन मुली. सगळं काही व्यवस्थित सुरू होतं, पण एका मोबाईल नंबरने 81125###### सगळं बदलून टाकलं. रोशनच्या म्हणण्यानुसार, गेली एक वर्षापासून शहीन या नंबरवर एका 'अनोळखी तरुणाशी' बोलत होती. जेव्हा रोशनने शहीनला त्या व्यक्तीबद्दल विचारलं, तेव्हा शहीन म्हणाली की, तो फक्त मित्र आहे आणि तिने त्याचं नाव-पत्ता सांगण्यास नकार दिला.

advertisement

5 मुलांचं काय होणार?

आणि मग तो दिवस आला, 18 मे 2025, जेव्हा शहीन ब्यूटी पार्लरला जात असल्याचं सांगून घरातून बाहेर पडली आणि परत आलीच नाही. आता रोशन 5 मुलांसह एकटा आहे आणि तो विचार करतोय, "माझी बायको सोडून गेली, आता या पाच मुलांचं पालनपोषण कोण करणार?" त्रस्त रोशनने पोलिसांत तक्रार केली आहे की, शहीन खातून आणि त्या 'अनोळखी प्रियकराचा' शोध घेतला जावा. रोशन पोलिसांना वारंवार आपल्या पत्नीचा शोध घेण्याची विनंती करत आहे.

advertisement

पोलीस पत्नी आणि अनोळखी व्यक्तीचा शोध घेत आहेत

आता रोशनला संशय आहे की, शहीन या तरुणाला फेसबुकवर भेटली असावी आणि गेली एक वर्षापासून ते दोघे मित्र असल्याचं नाटक करत होते. गौरा पोलीस स्टेशनचे प्रमुख बाजीगर कुमार यांनी सांगितलं की, 89/25 क्रमांकाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस बेपत्ता पत्नी आणि तिच्या प्रियकराचा शोध घेण्यात व्यस्त आहेत. त्याचवेळी, हे प्रकरण समोर आल्यानंतर परिसरातही विविध प्रकारच्या चर्चांना उधाण आलं आहे.

advertisement

हे ही वाचा : 22 वर्षांनी उघडकीस आलं सासू-जावयाचं लफडं, सासऱ्याने केली मुलांची DNA चाचणी, मग समोर आलं भयाण सत्य

हे ही वाचा : दिर वहिनीच्या माहेरी गेला, घरात घुसला अन् भावाच्या सासऱ्याची केली हत्या; पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा

मराठी बातम्या/क्राइम/
"ब्युटी पार्लरला जाऊन येते", असं सांगून घराबाहेर पडली 5 मुलांची आई; पोलीस स्टेशनबाहेर रडतोय पती, पत्नीचा 'तो' मित्र...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल