22 वर्षांनी उघडकीस आलं सासू-जावयाचं लफडं, सासऱ्याने केली मुलांची DNA चाचणी, मग समोर आलं भयाण सत्य

Last Updated:

Reddit वर एका महिलेने सांगितलेल्या अनुभवाने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. तिच्या सासू आणि नवऱ्याचं २२ वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. एकदा ती अचानक घरी परत आली आणि...

Shocking News
Shocking News
आपल्या भारतात नात्यांना खूप महत्त्व दिलं जातं. इथे श्रवणबाळासारखे पुत्र, राम-सीतेसारखे पती-पत्नी, लक्ष्मणासारखे दीर, जे आपल्या नात्याच्या मर्यादा जाणतात. पण परदेशी संस्कृतीत काही लोक नात्यांमध्ये इतका गलिच्छपणा आणतात की, ते ऐकून मन हेलावतं. असंच एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे.
22 वर्षांचं प्रेमप्रकरण उघड
अलीकडेच एका महिलेने सोशल मीडियावर आपल्या आयुष्यातील गुंतागुंतीच्या नात्याची कथा शेअर केली आहे, ज्याने सगळ्यांनाच धक्का बसला. तिने सांगितलं की, तिच्या स्वतःच्या आईचे तिच्या पतीसोबत गेली 22 वर्षांपासून संबंध होते. एके दिवशी तिने त्या दोघांना आपल्या बेडरूममध्ये आक्षेपार्ह अवस्थेत रंगेहाथ पकडलं. जेव्हा मुलीच्या वडिलांना म्हणजेच जावयाच्या सासऱ्याला ही घटना कळली, तेव्हा त्यांनी तात्काळ आपल्या लहान मुलांची डीएनए चाचणी करून घेतली. त्यानंतर जे रहस्य उघड झालं, त्याने संपूर्ण कुटुंबाला हादरवून सोडले.
advertisement
सोशल मीडियावर व्हायरल झालेली कथा
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर Reddit r/TrueOffMyChest नावाचा एक ग्रुप आहे. त्यावरील @blownupmarriage1 नावाच्या युझरने सुमारे 3 वर्षांपूर्वी एक लांबलचक पोस्ट लिहिली होती, ज्यात तिने आपल्या कुटुंबाशी संबंधित एक धक्कादायक सत्य उघड केलं. ती त्यावेळी 40 वर्षांची होती. तिने सांगितलं की, तिची आई आणि तिचा पती गेली 22 वर्षांपासून संबंधात होते. ती आणि तिचा पती दोघेही 15 वर्षांचे असल्यापासून एकमेकांचे प्रियकर-प्रेयसी होते. जेव्हा ती 17 वर्षांची असताना गरोदर राहिली, तेव्हा तिच्या पालकांनी त्यांना आपल्या घरात राहण्यासाठी जागा दिली. दोघांचेही वय 18 झाल्यावर त्यांनी लग्न केले. लग्नानंतर वडिलांनी आपली मुलगी आणि जावयासाठी आपल्या घराशेजारीच एक घर विकत घेतले, जिथे ते दोघे एकत्र राहू लागले.
advertisement
बेडरूममध्ये रंगेहाथ पकडले
त्या महिलेला एकूण 6 भावंडं होती. तिला स्वतःला 4 मुले होती आणि ती 7 महिन्यांची गरोदर होती. महिलेने सांगितलं की, एकदा ती तिच्या मैत्रिणींसोबत ट्रिपला गेली होती. पण ट्रिपहून एक दिवस आधीच ती परत आली. ती आपल्या बेडरूममध्ये जाताच, तिने तिची आई आणि तिच्या पतीला आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले. हे पाहून तिला धक्काच बसला. तिने आपल्या पतीला विचारले की, त्यांचे किती दिवसांपासून अफेअर सुरू आहे, तेव्हा त्याने सांगितले की लग्नापूर्वीपासूनच त्यांचे अफेअर सुरू होते.
advertisement
डीएनए चाचणीतून धक्कादायक सत्य बाहेर
यावरून त्या महिलेला समजले की, कदाचित तिचे दोन लहान जुळे भाऊ आणि सर्वात धाकटा भाऊ हे तिच्या पतीचीच मुले असण्याची शक्यता आहे. जेव्हा महिलेने ही गोष्ट आपल्या वडिलांना सांगितली, तेव्हा तेही पूर्णपणे कोलमडून गेले आणि त्यांनी लहान भावांची डीएनए चाचणी करण्याची मागणी केली. जेव्हा त्यांची डीएनए चाचणी केली गेली, तेव्हा धक्कादायक सत्य समोर आले की, ते जुळे भाऊ तिच्या पतीचीच मुले होती. यानंतर महिलेने आपल्या संपूर्ण कुटुंबाला या घटनेबद्दल सांगितले. वडिलांनी आईला घरातून हाकलून दिले, जी तिच्या बहिणीसोबत राहू लागली आणि महिलेच्या पतीसोबत घटस्फोटाची प्रक्रियाही सुरू करण्यात आली.
advertisement
आईनेच मुलीवर खापर फोडले
या पोस्टमध्ये महिलेने आणखी अनेक तपशील दिले होते, जे खूपच विचित्र आहेत. तिची ही पोस्ट व्हायरल झाली आणि तिला 29 हजारांहून अधिक लाईक्स आणि हजारो कमेंट्स मिळाल्या. महिलेने पोस्टमध्ये सांगितले की, तिची आई तिला पूर्णपणे दोष देत आहे आणि म्हणते की, या घटनेमुळे तिने तिचं घर उध्वस्त केलं आणि नोकरीही गमावली. यावर लोकांनी त्या महिलेला पाठिंबा दिला आणि म्हणाले की, तिची कोणतीही चूक नव्हती, तिची आई आणि पती फसवणूक करत होते आणि तिने योग्य पाऊल उचलले आहे.
advertisement
मराठी बातम्या/Viral/
22 वर्षांनी उघडकीस आलं सासू-जावयाचं लफडं, सासऱ्याने केली मुलांची DNA चाचणी, मग समोर आलं भयाण सत्य
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement