10 वर्षे झाली, बापानेच लोखंडी साखळीने बांधून ठेवलाय 'या' पोराला; त्यामागे आहे मन सुन्न करणारं कारण...
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
मानसिक आजाराने ग्रस्त असलेला मुकेश बैरवा नावाचा युवक गेल्या १० वर्षांपासून लोखंडाच्या साखळीत बांधून खोलीत कैद आहे. त्याच्या वडिलांनी सांगितलं की...
मुकेश बैरवा नावाचा एक तरुण गेल्या 10 वर्षांपासून एका बंद खोलीत लोखंडी साखळ्यांनी बांधलेला आयुष्य जगतोय. त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी त्याला बांधून ठेवायला सुरुवात केली आणि तेव्हापासून तो याच अवस्थेत जीवन जगत आहे. राजस्थानच्या दौसा जिल्ह्यातील सिकर भागातून हे प्रकरण समोर आलं आहे.
या घटनेनंतर बिघडलं मानसिक संतूलन
मुकेशचे वडील श्री लाल बैरवा यांनी लोकल 18 ला सांगितलं की, त्यांच्या मुलाचं लग्न सुमारे 12 वर्षांपूर्वी झालं होतं आणि काही काळानंतर त्याला एक दिव्यांग मुलगा झाला. त्या घटनेनंतर मुकेशचं मानसिक संतुलन बिघडलं. हळूहळू तो लोकांना दगड मारू लागला, शिव्या देऊ लागला आणि मारहाण करू लागला. घर रस्त्याच्या कडेला असल्यामुळे ये-जा करणाऱ्या लोकांना सतत त्रास होऊ लागला.
advertisement
10 वर्षांपासून खोलीत कैद
परिस्थिती हाताबाहेर जात आहे, हे पाहून कुटुंबीयांनी मुकेशला घराच्या एका खोलीत लोखंडी साखळीने बांधून ठेवलं. गेल्या 10 वर्षांपासून मुकेश त्याच खोलीत कैद आहे. ना पंख्याची हवा, ना बाहेर फिरण्याची मुभा, अगदी अन्न आणि पाणीसुद्धा त्याचे कुटुंबीय त्याला दारातूनच देतात. श्री लाल बैरवा स्वतः कर्करोगासारख्या गंभीर आजाराने त्रस्त आहेत. त्यांनी सांगितलं की, त्यांनी आपल्या मुलावर अनेकवेळा उपचार करण्याचा प्रयत्न केला, पण गंभीर आर्थिक संकटामुळे उपचार शक्य झाला नाही. आता ते सरकार आणि प्रशासनाकडे आपल्या मुलावर उपचार करण्यासाठी मदतीची याचना करत आहेत, जेणेकरून तो पुन्हा सामान्य जीवन जगू शकेल आणि या कैदतून त्याला मुक्ती मिळेल.
advertisement
सामाजिक संवेदनशीलतेची अपेक्षा
हे प्रकरण केवळ एका कुटुंबाच्या दुःखाचं उदाहरण नाही, तर मानसिक आरोग्य सेवांच्या गंभीर कमतरतेचं आणि सामाजिक संवेदनशीलतेची परीक्षा घेणारं आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे, जेणेकरून मुकेशसारख्या पीडितांना वेळेवर उपचार मिळू शकेल आणि ते सन्मानाचं जीवन जगू शकतील.
हे ही वाचा : "हॅलो, तुमची आई जिवंत आहे", 24 वर्षांनंतर मुलाला कळलं अन् धावत निघाला बंगालपासून राजस्थानपर्यंत...
advertisement
हे ही वाचा : वडील-मुलगी, सासरा-सून, शिक्षक-विद्यार्थी... यांच्यात अनैतिक संबंध का निर्माण होतात? मानसशास्त्र काय सांगतं?
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 17, 2025 6:30 PM IST
मराठी बातम्या/Viral/
10 वर्षे झाली, बापानेच लोखंडी साखळीने बांधून ठेवलाय 'या' पोराला; त्यामागे आहे मन सुन्न करणारं कारण...