मित्राला रील बनवायची होती अन्...
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार श्रेया महेश देवळे (वय-19, मूळ गाव उंब्रज, ता. कराड, जि. सातारा) सध्या शिक्षणानिमित्त कोल्हापूरातील कळंबा रिंगरोड येथील साळोखेनगरात मैत्रिणींसोबत राहत होती. ती इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्गात शिकत होती. बुधवारी दुपारी तिचा वर्गमित्र ओम संदीप पाटील (वय-19, रा. प्रथमेशनगर कळंबा, रिंगरोड कोल्हापूर) श्रेयाकडे आला. त्याला रील बनवण्यासाठी साडी हवी होती.
advertisement
ट्रकचालकच्या अचानक टर्नमुळे श्रेयाने गमवला जीव
ओम आणि श्रेया रात्री नऊच्या सुमारास दुचाकीवरून गंगावेश येथे गेला. दोघेही मामाच्या घरून साडी घेऊन सोन्या मारूती चौकातील भगतसिंग तरुण मंडळाजवळ आले. रात्री साडेदहाच्या सुमारास सिमेंट काॅंक्रीट मिक्सर ट्रकचालकाने दोघांना ओव्हरटेक केलं आणि अचानक डावीकडे टर्न घेतला. त्यामुळे ट्रकटे पाठीमागचे चाक दुचाकीला धडकले आणि दोघेही रस्त्यावर पडले. श्रेया दुचाकीच्या मागे बसली होती. तिला गंभीर दुखापत झाली. दरम्यान ट्रकचालकाने धूम ठोकली. आजुबाजुच्या लोकांनी सीपीआरमध्ये दाखल केले. पण उपचार सुरू असताना श्रेयाचा मृत्यू झाला.
हे ही वाचा : लातूर हादरलं: पत्नीला पळवून नेल्याने पतीची सटकली, काकाच्या कृत्याची दिली पुतण्याला शिक्षा, आधी अपहरण केलं मग...
हे ही वाचा : 'तो' रोज बस प्रवासात देतोय त्रास, आईला सांगितला प्रकार, पण.. अल्पवयीन मुलीने संपवलं जीवन!